शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

आईस्प्रोड विकणाऱ्या मुलाने जागविली समाजाची ‘अस्मिता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:23 IST

‘तो’ही हंसापुरीच्या कारखान्यातून आईस्प्रोड आणून विकायचा. पण, पैसे पुरायचे नाहीत म्हणून माचिस कंपनीत काम धरले. येथील मालकाने ‘त्याला’ खालच्या जातीचा आहे, म्हणून थेट कामावरूनच काढले. हा ‘त्याच्या’ अस्मिेतवरचा पहिला आघात. त्यानेच विद्रोहाची ठिणगी मनात पेरली अन् आईस्प्रोड विकणाऱ्या याच मुलाने आपल्या लेखनीला शस्त्र बनवून अवघ्या समाजाची अस्मिता जागवली.

ठळक मुद्देकुटुंबीयांनी सांगितली संघर्षगाथा : गंगाधर पानतावणेंचे आयुष्य ठरले पथदर्शक

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सात भावंडामधून ‘ते’ सहाव्या क्रमांकाचे. वडील विठोबा मिल कामगार होते. अठराविश्व दारिद्रयाचे ग्रहण घराला कायम लागलेले. पोटाची खळगी भरण्यासाठी सारेच भाऊ कायम श्रमाला जुंपलेले. याच क्रमात ‘तो’ही हंसापुरीच्या कारखान्यातून आईस्प्रोड आणून विकायचा. पण, पैसे पुरायचे नाहीत म्हणून माचिस कंपनीत काम धरले. येथील मालकाने ‘त्याला’ खालच्या जातीचा आहे, म्हणून थेट कामावरूनच काढले. हा ‘त्याच्या’ अस्मिेतवरचा पहिला आघात. त्यानेच विद्रोहाची ठिणगी मनात पेरली अन् आईस्प्रोड विकणाऱ्या याच मुलाने आपल्या लेखनीला शस्त्र बनवून अवघ्या समाजाची अस्मिता जागवली. या मुलाचे नाव होते गंगाधर पानतावणे. मंगळवारी त्यांचे निर्वान झालेअन् त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलेल्या संघर्षगाथेतून त्यांच्या नागपुरातील वास्तव्याचा खडतर प्रवास नव्याने अधोरेखित झाला. नागपूरच्या पाचपावली वस्तीत १९३७ साली त्यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब आजही त्या घरी राहते. त्यांचे पुतणे सुरेश पानतावणे यांनी लोकमतशी बोलताना गंगाधर पानतावणे यांच्या आठवणी सांगितल्या. वडील विठोबा मिल कामगार होते. मात्र शिक्षणाचे महत्त्व त्यांनी ओळखले होते. पाचपावलीत आजही उभी असलेली एससीएस मुलींची शाळा सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पानतावणेंनी अपार कष्ट करतानाही वाचनाची आवड जपली. डॉ. बाबासाहेबांचे मुकनायक मधील लेख ते आवर्जुन वाचायचे. संत तुकाराम, संत चोखामेळा यांचे अभंग त्यांना मुखोद््गत होते. नागपूरला शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या नेत्यांचे व्याख्यान असले की सर्व काम सोडून ते हजेरी लावायचे. बाबासाहेबांनी दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा घेतली तेव्हा लाखो अनुयांयामध्ये त्यांचाही सहभाग होता. त्यांचे मोठे बंधू सदाभाऊ हिंदू महासभेच्या कार्यात सहभागी झाल्याने सर्व कुटुंबीयांनी त्यांच्याशी नाते तोडल्याची आठवण सुरेश यांनी सांगितली. डॉ. पानतावणे यांना पाचपावली वस्तीविषयी विशेष आपुलकी होती. बाबासाहेबांच्या निधनानंतर त्यांनी ‘माणुसकीचे बंड’ या नाटकाचे लेखन करून मित्रांसोबत वस्तीमध्ये सादर केल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. भाऊ लोखंडे व प्रा. रणजित मेश्राम यांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. भाऊ व त्यांचे सहकारी त्यांना गुरू म्हणायचे. त्यांच्या खोलीमध्ये राहून शिक्षण घेतल्याची आठवण त्यांनी जागवली. असे हे माणूस घडविणारे विद्यापीठ आज काळाच्या पडद्याआड गेल्याने जगभरातील त्यांच्या चाहत्यांसह नागपूरही हळहळले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने पाचपावली तर सुन्न झाली होती.

टॅग्स :nagpurनागपूरDeathमृत्यू