शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आशा सेविकांनी मागितल्या स्कूटर पण मिळणार सायकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 17:01 IST

आशांची अशीही निराशा : संघटनांकडून कडाडून विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत कार्यरत आशा वर्कर यांनी सरकारकडे इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी केली होती. मात्र सरकारने फक्त ५००० रुपये मंजूर केले. ही रक्कम स्कूटर खरेदीसाठी अपुरी असल्यामुळे महापालिकेने त्याऐवजी आशांना सायकल देण्याचा पर्याय निवडला आहे.

१२०० सायकली पुरविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, या निर्णयाला आशा वर्करच्या संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. आशा कर्मचाऱ्यांना नियमितपणे घरांना भेट देणे, लसीकरण मोहिमा राबवणे आणि आरोग्यासंबंधी साहित्य वाहून नेण्याची जबाबदारी असते. त्यामुळे आशा वर्करने इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी सरकारकडे केली होती. महापालिकेने त्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. 

मात्र सरकारने केवळ ५ हजार रुपये मंजूर केले. ही रक्कम इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीसाठी अत्यंत अपुरी असल्याने महापालिकेने सायकली देण्याचा निर्णय घेतला. आशा वर्करच्या संघटनांनी सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. सरकारला आशा कर्मचाऱ्यांना मदत करायची असती, त्यांनी पुरेसा निधी मंजूर केला असता. सायकली हा पर्याय नाही, आशांसाठी सायकल कष्टदायकच आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.

"आशा कर्मचारी लांबचे अंतर पार करून औषधे आणि आवश्यक साहित्य घेऊन जातात. अशा परिस्थितीत सायकल योग्य पर्याय ठरत नाही. आम्ही इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी केली होती. मात्र, सरकारने आमच्या अडचणी लक्षात न घेता चुकीचा निर्णय घेतला आहे."- राजेंद्र साठे, जिल्हाध्यक्ष, आशावर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी संघटन (सीटू)

टॅग्स :nagpurनागपूर