शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ७५ दिवस व्हेंटिलेटरवरच; १९ वर्षीय दिव्याची झुंज यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 09:10 IST

तिच्या ‘जीबीएस’सोबतच्या लढाईत डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर :  ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ (जीबीएस) या दुर्मिळ आजाराने १९ वर्षीय दिव्याच्या शरीरातील मांसपेशी कमजोर पडल्या. ‘पॅरालिसीस’मुळे दोन्ही हातपाय लुळे पडले. याचा प्रभाव श्वसन यंत्रणेवरही झाला. गंभीर स्थिती निर्माण झाल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवले. या दरम्यान फुफ्फुसांमध्ये ‘म्युकस ब्लॉक’, न्युमोनिया, कमी-जास्त रक्तदाब, डायरियाही झाला. दिव्याला वाचविण्यासाठी मेडिकलच्या डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. दिव्यानेही काळाशी झुंज दिली. या यशस्वी संघर्षाच्या प्रवासात ७५ दिवसांनी ती व्हेंटिलेटरमधून बाहेर आली. 

दिव्या अकोल्यातील असून, डिसेंबरमध्ये अचानक तिच्या हातापायांना पॅरालिसीस झाले. खासगी रुग्णालयातून ‘जीबीएस’ नावाच्या दुर्मिळ आजाराचे निदान झाले. तिच्यावर १५ दिवसांचा उपचाराचा खर्च १६ लाखांवर गेला. हालाखीच्या स्थितीतील आई-वडिलांवर शेती, दागिने विकण्याची वेळ आली; परंतु पैसे संपल्याने १५ जानेवारीला दिव्याला नागपूर मेडिकलमध्ये आणले. डॉक्टरांनी तातडीने वॉर्ड क्रमांक ५२ मधील ‘आयसीयू’मध्ये दाखल करून उपचार केले. दिव्याच्या दुर्मिळ आजारावरील औषधांचा खर्च मोठा होता. औषधाची एक बाटली सात ते आठ हजार रुपयांची होती. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत तिची नोंदणी करण्यात आली. 

हातपाय हलविणे अशक्य,  आता केला नमस्कार  

सलग चार महिने ती ‘आयसीयू’मध्ये असल्याने डॉक्टरांसह परिचारिकांची ती छोटी बहीण झाली. डॉक्टरांच्या उपचाराला ती प्रतिसाद देत होती. यामुळे ७५ दिवसांनी व्हेंटिलेटरमधून बाहेर आली. सुरुवातीला हातपाय हलविणेही अशक्य असलेल्या दिव्याने सोमवारी रुग्णालयातून घरी जाताना डॉक्टर, परिचारिकांना दोन्ही हातांनी नमस्कार केला. तिच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव होते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरnagpurनागपूर