शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

आरोपी अरविंद सिंगने थांबविला खटला

By admin | Updated: February 10, 2015 00:51 IST

योग्य न्यायासाठी आपणाविरुद्धचा खटला अन्य न्यायालयात स्थानांतरित केला जावा म्हणून उच्च न्यायालयात दाद मागण्याकरिता सोमवारी खुद्द आरोपी अरविंद सिंग याने युग चांडक

नागपूर : योग्य न्यायासाठी आपणाविरुद्धचा खटला अन्य न्यायालयात स्थानांतरित केला जावा म्हणून उच्च न्यायालयात दाद मागण्याकरिता सोमवारी खुद्द आरोपी अरविंद सिंग याने युग चांडक अपहरण खून खटल्याची सुनावणी थांबवली. जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात हा खटला सुरू असून, न्यायालयाने २३ फेब्रुवारीपर्यंत खटल्याची सुनावणी तहकूब केली.‘चप्पल’वरून गोंधळआरोपी अरविंद सिंग याच्या कबुलीजबाबातील एक पंच साक्षीदार हर्ष प्रकाशचंद्र फिरोदिया याची सरतपासणी सरकारी वकील ज्योती वजानी यांनी घेतली. या साक्षीदाराने असे सांगितले की, अरविंद सिंग याने लकडगंज पोलीस ठाण्यात आपल्या व अन्य दुसऱ्या पंचासमोर कबुलीजबाब दिला होता. माझ्या घरी चला , मी गुन्ह्यात वापरलेले कपडे व साहित्य काढून देतो, असे तो म्हणाला होता. ९ सप्टेंबर २०१४ रोजी त्याने हा कबुलीजबाब दिला होता. त्यानंतर पोलीस आणि आम्ही दोन पंच अरविंद सिंगसोबत त्याच्या जरीपटका कपिलनगर येथील घरी गेलो. घरातून त्याने लाल रंगाचा युगचा टी-शर्ट, युगच्या कानातील बाळी आणि स्वत:चे कपडे काढून दिले होते, असेही या साक्षीदाराने सांगितले. या साक्षीदाराची उलटतपासणी आरोपी राजेश दवारे याचे वकील अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल यांनी घेण्यास नकार दिला. दुसरा आरोपी अरविंद सिंग याचे वकील अ‍ॅड. मनमोहन उपाध्याय यांनी या साक्षीदाराची उलटतपासणी सुरू केली. उपाध्याय यांनी या साक्षीदारास कबुलीजबाबाच्या वेळी आरोपीने कोणते कपडे घातले होते, असा प्रश्न करताच साक्षीदाराने पांढऱ्या रंगाच्या कपड्याचा उल्लेख केला. आरोपीने कोणती चप्पल घातली होती, असा प्रश्न करताच न्यायालयाने हस्तक्षेप करीत अ‍ॅड. उपाध्याय यांना थांबवले. या प्रश्नाचा या खटल्याशी संबंध नाही, म्हणून आपण या प्रश्नाची आणि उत्तराचीही नोंद करणार नाही, असे स्पष्ट केले. यावर अ‍ॅड. उपाध्याय आणि न्यायाधीशात शाब्दिक चकमक उडाली. लागलीच उपाध्याय यांनी आरोपी अरविंद सिंग याच्यावतीने न्यायालयात खटला तहकुबीचा अर्ज दाखल केला. महत्त्वाच्या साक्षीदाराला वस्तुस्थितीवर आधारित उलटतपासणीत आपल्या वकिलास प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. साक्षीदाराच्या स्मरणशक्ती तपासणीबाबतचा प्रश्न विचारण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे योग्य न्यायासाठी हा खटला अन्य न्यायालयात स्थानांतरित व्हावा म्हणून उच्च न्यायालयात दाद मागण्याकरिता हा खटला तहकूब करावा, असा उल्लेख अर्जात करण्यात आला. साक्षीदाराच्या स्मरणशक्ती तपासणीसाठी प्रश्न विचारण्याचे प्रावधान कोणत्याही कायद्यात नाही, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट करून खटल्याची सुनावणी २३ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली. न्यायालयात फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांचे वकील अ‍ॅड. राजेंद्र डागा उपस्थित होते. (प्रतिनिधी)