शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अरुण गवळीला नागपूर कारागृहात आत्मसमर्पण करण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 15:51 IST

कुख्यात डॉन अरूण गवळीने ५ दिवसात नागपूर मध्यवर्ती कारागृहास शरण यावे असा आदेश नागपूर उच्च न्यायालयाने दिला आहे.

ठळक मुद्देप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पाच दिवसाची मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी कुख्यात डॉन अरुण गवळी याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला. यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्याला पाच दिवसाची मुदत देण्यात आली.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गवळीने नागपूर येथे येण्याची परवानगी मिळण्यासाठी सक्षम प्राधिकाºयाकडे २४ तासांत अर्ज सादर करावा व सक्षम प्राधिकाºयाने हा अर्ज मिळाल्यानंतर गवळीला नागपूर येथे येण्यासाठी २४ तासांत परवानगी द्यावी आणि ही परवानगी मिळाल्यानंतर गवळीने पुढील तीन दिवसात नागपूर मध्यवर्ती कारागृहात आत्मसमर्पण करावे असे न्यायालयाने सांगितले.

उच्च न्यायालयाने २२ मे रोजी गवळीची पॅरोल मुदतवाढीची तिसरी याचिका फेटाळून त्याला २४ मे रोजी नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार गवळी तळोजा कारागृहात गेला होता. परंतु, कोरोनामुळे त्याला कारागृहात प्रवेश देण्यात आला नाही. परिणामी, त्याने चौथ्यांदा पॅरोल मुदतवाढ मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी त्याला वरील आदेश देण्यात आला. पत्नीच्या आजारपणामुळे गवळीला सुरुवातीला ४५ दिवसाचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार त्याला २७ एप्रिल रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृहात आत्मसमर्पण करायचे होते. परंतु, लॉकडाऊनमुळे उच्च न्यायालयाने त्याला पहिल्यांदा १० मेपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर लॉकडाऊन लांबले. परिणामी, न्यायालयाने गवळीच्या पॅरोलमध्ये दुसºयांदा २४ मेपर्यंत वाढ केली होती. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. गवळीतर्फे अ‍ॅड. मिर नगमान अली यांनी कामकाज पाहिले. 

टॅग्स :Arun Gawliअरुण गवळी