शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बंदिवानांनी साकारल्या कलाकुसरीच्या भेटवस्तू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 22:29 IST

बंदिवानांच्या कौशल्याचे दर्शन सध्या कारागृह परिसरात लागलेल्या भेटवस्तूंच्या प्रदर्शनातून होत आहे. दिवाळी सणाचे औचित्य साधून खास या उत्सवात उपयोगी पडणाऱ्या भेटवस्तू आकर्षक ठरल्या आहेत.

ठळक मुद्देकारागृह परिसरात वस्तूंचे प्रदर्शन : दिवाळी सणातील रंगीबेरंगी पणत्या, शोपीसचे साहित्य

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कैद्यांची सुधारणा व पुनर्वसन हे मध्यवर्ती कारागृहाचे ब्रीदवाक्य होय. याअंतर्गत बंदिवानांकडून लोहारकाम, सुतारकाम, विणकाम व पॉवरलूम आदींचे कार्य करविले जाते. अशा विविध कामातूनच कारागृहात राहणाऱ्या बंदिवानांमधील कलाकौशल्याला चालना मिळते.बंदिवानांच्या याच कौशल्याचे दर्शन सध्या कारागृह परिसरात लागलेल्या भेटवस्तूंच्या प्रदर्शनातून होत आहे. दिवाळी सणाचे औचित्य साधून खास या उत्सवात उपयोगी पडणाऱ्या भेटवस्तू आकर्षक ठरल्या आहेत.शहराच्या दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त बी.जी. गायकर व सिनेकलावंत राजेश चिटणीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. कारागृहातील उद्योगांमध्ये विविध प्रकारच्या व्यावसायिक व रोजगारयुक्त वस्तूंचे प्रशिक्षण बंदिवानांना दिले जाते. या उद्योगातून त्यांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या लाकडी, लोखंडी, कापडी व इतर शोभेच्या वस्तू रक्षाबंधन, दसरा व दिवाळी आदी सणानिमित्त सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात येतात. बंदिवानांना कारागृहात रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांनी बनविलेल्या वस्तू समाजापर्यंत पोहचाव्यात आणि आपण चांगलं काही केले, ही भावना त्यांच्यात निर्माण व्हावी, हा या उत्पादनामागचा उद्देश कारागृह प्रशासनातर्फे ठेवला आहे. यासाठी कारागृह परिसरात कारागृह निर्मित वस्तूंचे विक्री केंद्र उभारण्यात आले असून, याद्वारे विविध बंदिवानांनी तयार केलेल्या विविध वस्तू वर्षभर उपलब्ध करण्यात येतात. दिवाळी सणानिमित्त अशाच प्रकारचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. यात रंगीबेरंगी पणत्या, हातमागाच्या साड्या, लाकडी व लोखंडी वस्तू, शो-पीसच्या वस्तू, दऱ्या, आसनपट्ट्या, कपडे, टॉवेल अशा अनेक प्रकारच्या आकर्षक वस्तू प्रदर्शनात मांडल्या आहेत. ज्या सामान्य नागरिकांना आकर्षित करतील आणि उपयोगाच्याही ठरतील.कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे, कारखाना व्यवस्थापक राजाराम भोसले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी वसंत वानखेडे, तुरुंगाधिकारी विकास रजनलवार, कमलाकर मिरासे, आनंद कांदे, दयानंद सोरटे, देवराव आढे, प्रशासन अधिकारी बी.पी. चव्हाण, शिक्षक योगेश पाटील आदी अधिकारी व कर्मचारी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.

टॅग्स :jailतुरुंगnagpurनागपूर