शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 23:57 IST

वर्धमाननगरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीस रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. त्याच्याकडून ८ रेल्वे आरक्षणाची तिकिटे, आधी काढलेल्या ६ तिकिटांसह ६०९८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : १४ तिकिटांसह ६०९८५ रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : वर्धमाननगरात रेल्वेतिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीस रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. त्याच्याकडून ८ रेल्वे आरक्षणाची तिकिटे, आधी काढलेल्या ६ तिकिटांसह ६०९८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.रेल्वे सुरक्षा दलाचे प्रधान आरक्षक सुरेश डुलगच यांनी वर्धमाननगरीत एका दुकानात ई-तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची माहिती निरीक्षक रवि जेम्स यांना दिली. त्यांच्या आदेशानुसार सुरेश डुलगच, नवल डाबेराव, संदीप सोनवने, बी. एम. मदनकर, अमित बारापात्रे हे नंदनवन पोलिसांना घेऊन घटनास्थळी रवाना झाले. वर्धमाननगर भीम चौक येथील बालाजी इंटरप्रायजेस दुकानाच्या बाजूला असलेल्या दुकानावर त्यांनी धाड टाकली. तेथे काऊंटरवर बसलेल्या व्यक्तीने आपले नाव सुमित राजकुमार गजभिये (२७) रा. प्लॉट नं. ११७, सुगत बौद्ध विहाराजवळ, गरोबा मैदान असे सांगितले. गरजू ग्राहकांकडून १०० ते २०० रुपये अधिक घेऊन ई-तिकीट पुरवित असल्याचे त्याने चौकशीत सांगितले. त्याच्या जवळील लॅपटॉपची तपासणी केली असता ८ ई-तिकीट किंमत १८९४४ तसेच आधी काढलेले ६ ई-तिकीट किंमत १४५४१ जप्त करण्यात आले. याशिवाय लॅपटॉप १५ हजार, डोंगल, मोबाईल असा एकुण ६०९८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याला आरपीएफ ठाण्यात आणून पंचासमक्ष चौकशी केली असता त्याने पाच फेक आयडीच्या साहाय्याने ई-तिकिटांचा काळाबाजार करीत असल्याची कबुली दिली. त्याच्या विरुद्ध रेल्वे अ‍ॅक्ट १४३ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त भवानी शंकर नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वेArrestअटकticketतिकिट