शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

मुख्यमंत्र्यांविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट करणारा जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 05:30 IST

Nagpur News : आरोपी समीत प्रॉपर्टी डीलर असून त्याचे वडील वाहतूक व्यावसायिक आहेत. तो सोशल मीडियावर आक्रमकपणे सक्रिय राहतो. त्याने ऑगस्टमध्ये ट्विटरवर सातत्याने मुख्यमंत्री ठाकरे, आदित्य ठाकरे, राऊत यांच्याविरोधात अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.

नागपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सोशल मीडियावर गरळ ओकून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला सीताबर्डी पोलिसांनी थेट गुजरातमध्ये जाऊन अटक केली. समीत  ठक्कर (३२) असे त्याचे नाव असून तो नागपुरातील वाठोडा  भागात गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये  राहतो.आरोपी समीत प्रॉपर्टी डीलर असून त्याचे वडील वाहतूक व्यावसायिक आहेत. तो सोशल मीडियावर आक्रमकपणे सक्रिय राहतो. त्याने ऑगस्टमध्ये ट्विटरवर सातत्याने मुख्यमंत्री ठाकरे, आदित्य ठाकरे, राऊत यांच्याविरोधात अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यामुळे शिवसैनिक कमालीचे संतप्त झाले होेते. सीताबर्डी पोलिसांनी समीतविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात मुंबईतही गुन्हा दाखल झाला होता. तेथे चौकशी सुरू असताना तो गुजरातमधील राजकोटला पळून गेला. त्याचे लोकेशन ट्रेस झाल्यानंतर सीताबर्डी पोलिसांचे एक पथक राजकोटला पोहचले. तेथे त्याच्या मुसक्या बांधून नागपुरात आणण्यात आले. सोमवारी न्यायालयाने ठक्करला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.डोके भडकावणारे कोण?ठक्कर याने ऑगस्टमध्ये तीन वेगवेगळे ट्विट केले आहेत. आरोपीचे सोशल मीडियावरील फाॅलोअर्स बघता त्याला यात आणखी कुणी मदत केली, कुणी डोके भडकविले, राजकोटला त्याला कुणी आश्रय दिला, या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधणार आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र