शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या तारेच्या कुंपणाचे लोखंडी ॲंगल चोरणारा अटकेत

By योगेश पांडे | Updated: August 25, 2023 18:12 IST

गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकची कामगिरी

नागपूर : वनविभागाच्या जागेवर तारेचे कुंपण करण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी ॲंगल चोरणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकने ही कामगिरी केली.

प्रकाश कालू चव्हाण (२८, हिंगणा) यांना बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऑक्सीजन पार्क वाहतूक पोलीस चौकीच्या मागे वर्धा मार्गा ते जबलपूर मार्गाच्या रस्त्यालगतचे वनविभागाच्या तारेच्या कुंपणाचे काम मिळाले होते. २१ जुलै रोजी त्यांनी तेथे कुंपणासाठी २१३ लोखंडी ॲंगल लावले. मात्र रात्रीच्या सुमारास त्यातील सुमारे ४५ हजारांचे ६० ॲंगल अज्ञात चोरट्याने चोरून नेले.

चव्हाण यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाला खबऱ्यांच्या माध्यमातून माहिती मिळाली की यात प्रतिक उर्फ गोलू रामनरेश पटेल (२२, श्रमिकनगर झोपडपट्टी) हा सहभागी आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने दोन मित्रांसह गुन्हा केल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्याला बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, प्रवीण महामुनी, बबन राऊत, सुनित गुजर, नितीन वासनिक, विनोद देशमुख, मनोज टेकाम, सुशांत सोळंके, हेमंत लोणारे, योगेश सातपुते, चंद्रशेखर भारती यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर