शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दीड हजार आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:43 IST

‘कोरोना’चा प्रसार होऊ नये यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नागपूर शहराच्या विविध शासकीय इमारतींमध्ये दीड हजार आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशासकीय इमारतींमध्ये विलगीकरण केंद्रआमदार निवासात साडेचारशे व्यक्तींसाठी सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’चा प्रसार होऊ नये यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहराच्या विविध शासकीय इमारतींमध्ये दीड हजार आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आमदार निवासात तर २१० खोल्यांमध्ये सुमारे साडेचारशे व्यक्तींची सुविधा करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी मंगळवारी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ‘कोरोना’ विषाणूसंदर्भात विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय यादव, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, विक्रम साळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, महसूल उपायुक्त सुधाकर तेलंग, जिल्हा शल्यचिकित्सक देवेंद्र पातुरकर उपस्थित होते. कोरोना विषाणूसंदर्भात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस विलगीकरण केंद्रात राहणे बंधनकारक आहे. दररोज येणाºया आंतरराष्ट्रीय प्रवाशांना विलगीकरण केंद्रात आणण्याची सुविधा करण्यात आली असल्याची माहिती डॉ. संजीव कुमार यांनी दिली.पोलिसांची सुरक्षा ठेवाविलगीकरण केंद्रात विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या केंद्रातील नागरिकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच केंद्रांमध्ये पोलिसांची सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवा, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.

शासनाच्या दिशानिर्देशानुसारच उपाययोजना : जिल्हाधिकारी‘कोरोना’बाबत काय उपाययोजना करायची व काय काळजी घ्यायची याबाबत राज्य व केंद्र सरकारचे स्पष्ट दिशानिर्देश प्रशासनाला मिळाले आहेत. त्यानुसारच आम्हाला काम करायचे आहेत. सध्या तरी देशांतर्गत विमानप्रवास करणाºया प्रवाशांची तपासणी करण्याबाबत कुठल्याही सूचना नाहीत. त्यामुळे आम्ही त्याबाबतचा निर्णय घेऊ शकत नाही, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस