शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

‘नॉन कॉन्ट्रॅक्ट वॉर’ अप्रत्यक्ष युद्धासाठी आर्मी नेहमीच सज्ज : लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 21:12 IST

‘नॉन कॉन्ट्रॅक्ट वॉर’ अप्रत्यक्ष युद्धाबाबत आम्ही नेहमीच सतर्क व सज्ज असतो. त्यासाठी आर्मीची सुरक्षेबाबतची पूर्ण तयारी आहे, असे भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत म्हणाले. भोसला मिलिटरी स्कूलचा २३ वा वार्षिक समारंभ शनिवारी कस्तूरचंद पार्कवर आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.

ठळक मुद्देसोशल मीडियाचा वापर योग्य ज्ञानासाठी कराभोसला मिलिटरी शाळेचा वार्षिक समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘नॉन कॉन्ट्रॅक्ट वॉर’ अप्रत्यक्ष युद्धाबाबत आम्ही नेहमीच सतर्क व सज्ज असतो. त्यासाठी आर्मीची सुरक्षेबाबतची पूर्ण तयारी आहे, असे भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत म्हणाले. भोसला मिलिटरी स्कूलचा २३ वा वार्षिक समारंभ शनिवारी कस्तूरचंद पार्कवर आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.आज सोशल मीडियावर बरीच माहिती उपलब्ध आहे. तेव्हा सोशल मीडियाचा वापर ग्रीटिंग कार्ड, जोक किंवा चुकीची माहिती पाठवण्यासाठी न करता योग्य ज्ञान व शिक्षणासाठी करावा. स्वत:चे करिअर घडवण्यासाठी करावा, असे आवाहनही त्यांनी या समारंभात मुख्य वक्ते म्हणून केले. 

या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्य अतिथी होते. राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भोसला मिलिटरी स्कूलचे प्रमुख शैलेश जोगळेकर, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी (सीएचएमईएस) नागपूर विभागाचे चेअरमन सूर्यभान डागा, सचिव कुमार काळे, शाळेचे कमांडंट कर्नल जे.एस. भंडारी, प्राचार्य अजय शिर्के, लेफ्ट.जनरल बी.बी. शेकटकर, दिलीप बेलगावकर प्रामुख्याने उपस्थित होते. 
जनरल बीपिन रावत यांनी यावेळी भोसला मिलिटरी स्कूलच्या कार्याची प्रशंसा केली. ज्ञान मिळवण्यासाठी आज अनेक साधने उपलब्ध आहेत. परंतु चांगले आणि मुलांना सुसंस्कृत घडविणारे शिक्षण हे शाळेतच मिळते. त्यामुळे शाळा फार महत्त्वाची आहे. भोसला मिलिटरी शाळेच्या माध्यमातून मुलांना शिस्तप्रिय आणि दर्जेदार शिक्षण देण्यात येत आहे. मुलंही देशाचे भविष्य आहे. यांच्या खांद्यावरच उद्याच्या देशाचा विकास व प्रगती अवलंबून आहे. येथील मुलांनी सैन्यात यावे, असे आवाहनही त्यांनी केले. 
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०३५ पर्यंत इतर देश वयोवद्ध होणार असून भारत हा जगातील सर्वात तरुण देश असणार आहे. देश किती युवा आहे, यावर त्याचे भविष्य अवलंबून नाही तर युवकांमधील शिस्त आणि देशभक्ती यावर त्यांचे भविष्य व विकास अवलंबून आहे. देशासमोर अनेक आव्हाने आहेत. मात्र येणारा काळ हा सुवर्ण असणार आहे, असे ते म्हणाले. सैन्यापासून आम्हाला प्रेरणा, आत्मविश्वास मिळतो. सैनिकी मूल्यांचे संगोपन आणि शिस्त मुलांमध्ये रुजविण्याचे काम भोसला मिलिटरी स्कूल करीत आहे. हे फार प्रशंसनीय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.तत्पूर्वी भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी परेड केली. लष्करप्रमुख रावत यांनी परेडचे अवलोकन केले. यानंतर विद्यार्थ्यांनी एअरो मॉडेलिंग शो, जिम्नॅस्टिक, बिग जम्प, लेझिम, हॉर्स रायडिंगद्वारे उपस्थितांचे लक्ष वेधले.उत्कर्ष राठोड बेस्ट कॅडेटउत्कर्ष राठोडला बेस्ट कॅडेट म्हणून घोषित करण्यात आले. यावेळी त्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लष्करप्रमु रावत यांच्या हस्ते गौरवही करण्यात आला. बेस्ट भवनाचा पुरस्कार गुरु गोविंदसिंह भवन यांना देण्यात आला. तर राणाप्रताप कंपनीला चॅम्पियन ट्रॉफी देण्यात आली.अप्रत्यक्ष युद्धासाठी आर्मी नेहमीच सज्जयावेळी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्याचे टाळले, परंतु त्याच वेळी ‘नॉन कॉन्ट्रॅक्ट वॉर’ अप्रत्यक्ष युद्ध याबाबत त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, अप्रत्यक्ष युद्धाबाबत आम्ही नेहमीच सतर्क व सज्ज असतो. त्यासाठी आर्मीची सुरक्षेबाबतची पूर्ण तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतnagpurनागपूर