शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

नागपूरच्या प्रगतीने अर्मेनियाचे पंतप्रधान प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 00:14 IST

सर्वात झपाट्याने विकसित होणारे शहर आणि भारताचे हृदयस्थळ म्हणून देश-विदेशात ओळखल्या जाणाऱ्या नागपूरच्या प्रगतीचा माहिती आढावा ऐकून अर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान चांगलेच प्रभावित झाले. पूर्वनियोजित दौऱ्यानुसार पंतप्रधान पाशिनयान, त्यांची पत्नी अ‍ॅना हाकोबयान, मंत्रिमंडळातील सहकारी तसेच पत्रकारांसह २४ जणांचे प्रतिनिधीमंडळ विशेष विमानाने आज दुपारी ४.१० वाजता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यानंतर ते येथे तब्बल पावणेदोन तास थांबले होते.

ठळक मुद्देविमानतळावर सपत्नीक पावणेदोन तास थांबलेजिल्हाधिकारी-पोलीस आयुक्तांच्या आदरातिथ्याने गदगदविदेश उपमंत्र्यांसह २४ जणांचे प्रतिनिधीमंडळ

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वात झपाट्याने विकसित होणारे शहर आणि भारताचे हृदयस्थळ म्हणून देश-विदेशात ओळखल्या जाणाऱ्या नागपूरच्या प्रगतीचा माहिती आढावा ऐकून अर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान चांगलेच प्रभावित झाले. पूर्वनियोजित दौऱ्यानुसार पंतप्रधान पाशिनयान, त्यांची पत्नी अ‍ॅना हाकोबयान, मंत्रिमंडळातील सहकारी तसेच पत्रकारांसह २४ जणांचे प्रतिनिधीमंडळ विशेष विमानाने आज दुपारी ४.१० वाजता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यानंतर ते येथे तब्बल पावणेदोन तास थांबले होते.युरोपमधील डोंगराळ भागात अर्मेनिया हा छोटासा देश आहे. या देशाचे पंतप्रधान आपल्या प्रतिनिधी मंडळासह अनोई(व्हिएतनाम)ला जाण्यासाठी निघाले होते. राजशिष्टाचारानुसार, त्यांच्या दौऱ्याची कल्पना भारतीय सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली होती. त्यांच्या विशेष विमानात नागपूरच्या विमानतळावर इंधन भरले जाणार, याबाबतही पूर्वकल्पना देण्यात आली होती. त्यानुसार, विमानतळ सुरक्षा प्रशासन आणि नागपूर पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले होते. त्यानुसार, पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी दुपारी २ वाजतापासून नागपूर विमानतळाच्या सभोवताल (बाहेरच्या भागात) सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त लावला होता. आतमध्ये नेहमीप्रमाणे सीआयएसएफच्या जवानांनी सुरक्षेची जबाबदारी सांभाळली. दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी पंतप्रधान पाशिनयान यांचे विशेष विमान नागपूर विमातळावर उतरले. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी त्यांचे नागपूर विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय, उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे उपस्थित होते.पंतप्रधान पाशिनयान यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अ‍ॅना हाकोबयान, विदेश मंत्रालयाचे उपमंत्री अव्हेट अ‍ॅडोन्टस, उच्च तंत्र उद्योगमंत्री हाकोब अर्शाक्यान, राजदूत आणि पत्रकारांसह २४ जणांचे प्रतिनिधी मंडळ होते. जिल्हाधिकारी मुदगल आणि पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी या सर्वांची खास व्यवस्था केली. येथील आदरातिथ्याने भारावलेले पंतप्रधान पाशिनयान आणि पत्नी अ‍ॅना यांनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तांशी दिलखुलास चर्चा करून नागपूरच्या प्रगतीबाबतचा आलेख जाणून घेतला. यांच्याकडून त्यांनी नागपूरची प्रशासकीय रचना, प्राप्तीकरांचे स्रोत जाणून घेतले. प्रशासनातर्फे उपराजधानीत राबविल्या जाणाºया विकास आणि लोकाभिमुख उपक्रमांची माहिती जिल्हाधिकारी मुदगल यांनी त्यांना दिली. तर, पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी त्यांना येथील गुन्हेगारीचे स्वरूप आणि कम्युनिटी पुलिसिंगबाबत माहिती दिली. दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी नागपूर विमानतळावर आलेले पंतप्रधान पाशिनयान आणि त्यांचे प्रतिनिधीमंडळ सायंकाळी ६ पर्यंत विमानतळावर होते. दरम्यानच्या कालावधीत विमानात इंधन भरून घेतल्यानंतर अनोई (व्हिएतनाम)कडे जाण्यासाठी पंतप्रधान पाशिनयान आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाने येथून दिल्लीकडे प्रयाण केले.पुन्हा पाच दिवसांनी येणारपंतप्रधान पाशिनयान आणि त्यांची पत्नी अ‍ॅना यांनी विमानतळावर चर्चेदरम्यान सॅण्डविच तसेच चहाचा आस्वाद घेतला. येथील एकूणच आदरातिथ्याने ते एवढे भारावले की ९ जुलैला आपण परत नागपुरात येऊ त्यावेळी आणखी चर्चा करू, असे म्हणत पंतप्रधान पाशिनयान यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांचा निरोप घेतला.

 

टॅग्स :prime ministerपंतप्रधानnagpurनागपूर