लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महालमधील सशस्त्र गुंडांनी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्कायलार्क हॉटेलच्या मागे गुरुवारी मध्यरात्री प्रचंड हैदोस घातला. एकाला खंजीरने भोसकले. तर, इतरांनी नंग्या तलवारी नाचवून आजूबाजूच्यांमध्ये दहशत निर्माण केली. तब्बल अर्धा तास हा प्रकार सुरू होता.मोमिनपुऱ्यातील रहिवासी वसिम अख्तर ऊर्फ आसू नसिम अख्तर (वय २७) हा रेस्टॉरेंटचा संचालक आहे. तर, मुख्य आरोपी मुस्फिक खान का कबाडी आहे. त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. गुरुवारी मध्यरात्री आसू त्याच्या मित्रासह स्कायलार्क हॉटेलच्या मागे निराला स्कूलजवळ बसून होता. तेथे आरोपी मुस्फिक खान (वय २५, रा. रजा टाऊन), मोहतसिर मदनी (वय ३०, रा. किल्ला परिसर महाल), तबरेज ऊर्फ बाबा इरफान कबाडीचा भाचा (वय २५, रा. युनानी दवाखान्याजवळ), फैजान (वय २३, रा. चुना मस्जिद जवळ) आणि अवेश मेमन (वय ३०, रा. बंगाली पंजा शाळेजवळ) आले. त्यांच्याजवळ खंजीर, तलवारी होत्या. आरोपी मुस्फिक खानने आसूसोबत वाद घातला. त्याला शिवीगाळ करून खंजीरने भोसकले. तर, आरोपी अवेश मेमन याने तलवार उगारून जीवे मारण्याची धमकी दिली. अन्य आरोपींनी आरडाओरड तसेच शिवीगाळ करून आसूच्या मित्रांना आणि इतरांना शिवीगाळ करून धमक्या दिल्या. तब्बल अर्धा तास त्यांची आरडाओरड, शिवीगाळ आणि मारहाण सुरू होती. त्यामुळे परिसरात प्रचंड दहशत पसरली.परिसरात तणावकिल्ला भागातील सशस्त्र गुंड हैदोस घालत असल्याचे कळल्याने मोमिनपुऱ्यातील तरुणांनी त्यांना हाकलून लावण्याची तयारी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती कळताच तहसील ठाण्यातील पोलीस, परिसरातील गस्ती पथके तेथे पोहचली. त्यापूर्वीच आरोपी पळून गेले. आसू याच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. आसूवर उपचार सुरू असून, फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
नागपूरच्या मोमीनपुऱ्यात सशस्त्र गुंडांचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 20:37 IST
महालमधील सशस्त्र गुंडांनी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्कायलार्क हॉटेलच्या मागे गुरुवारी मध्यरात्री प्रचंड हैदोस घातला. एकाला खंजीरने भोसकले. तर, इतरांनी नंग्या तलवारी नाचवून आजूबाजूच्यांमध्ये दहशत निर्माण केली. तब्बल अर्धा तास हा प्रकार सुरू होता.
नागपूरच्या मोमीनपुऱ्यात सशस्त्र गुंडांचा हैदोस
ठळक मुद्देतरुणाला खंजीरने भोसकले : तलवारीच्या धाकावर दहशत