ग्वालबन्शीच्या संपत्तीवर टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 01:53 AM2017-09-21T01:53:37+5:302017-09-21T01:53:53+5:30

भूमाफिया दिलीप शिवदास ग्वालबन्शी आणि त्याची पत्नी शुभांगी ग्वालबन्शी यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचे (मोक्का) विशेष न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने दिले.....

An armchair on the wealth of Gwalbanshi | ग्वालबन्शीच्या संपत्तीवर टाच

ग्वालबन्शीच्या संपत्तीवर टाच

googlenewsNext
ठळक मुद्देमोक्का न्यायालयाचे आदेश : भूमाफिया दिलीप ग्वालबन्शीने पचविल्या कोट्यवधीच्या जमिनी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भूमाफिया दिलीप शिवदास ग्वालबन्शी आणि त्याची पत्नी शुभांगी ग्वालबन्शी यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचे (मोक्का) विशेष न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने दिले.
ग्वालबन्शी दाम्पत्याची संपत्ती मोक्काच्या कलम २० (२)अंतर्गत जप्त करण्याची परवानगी मागणारा अर्ज या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांनी न्यायालयाला केला होता.
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मकरधोकडा येथील रहिवासी असलेला दिलीप ग्वालबन्शी याला अपराध क्रमांक ८५/२०१७ मध्ये भादंविच्या १४१, १४३, ३४१, ३५२, ३८७, १४९ अंतर्गत अटक करण्यात आल्यानंतर, अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून १० जून २०१७ रोजी मोक्काअंतर्गतचे कलम ३ वाढविण्यात आले होते.
ग्वालबन्शीच्या संपत्तीवर टाच
आरोपीने लोकांच्या मनात दहशत निर्माण करून खंडणी वसुलीतून संपत्ती प्राप्त केलेली आहे. दिलीप ग्वालबन्शी हा कोणताही व्यवसाय करीत नाही, तो शेतकरीही नाही, तरीही त्याने मोठ्या प्रमाणावर संपत्ती प्राप्त केली आहे. त्याने पत्नीच्या नावेही बरीच संपत्ती खरेदी केलेली आहे, असे तपास अधिकाºयाला तपासात निष्पन्न झाले. जप्त संपत्तीच्या निश्चितीबाबतही न्यायालयाने ग्वालबन्शी दाम्पत्याला नोटीस जारी करून २९ सप्टेंबरपर्यंत उत्तर मागविले आहे.
आरोपीने लोकांच्या मनात दहशत निर्माण करून खंडणी वसुलीतून संपत्ती प्राप्त केलेली आहे. दिलीप ग्वालबन्शी हा कोणताही व्यवसाय करीत नाही, तो शेतकरीही नाही, तरीही त्याने मोठ्या प्रमाणावर संपत्ती प्राप्त केली आहे. त्याने पत्नीच्या नावेही बरीच संपत्ती खरेदी केलेली आहे, असे तपास अधिकाºयाला तपासात निष्पन्न झाले. जप्त संपत्तीच्या निश्चितीबाबतही न्यायालयाने ग्वालबन्शी दाम्पत्याला नोटीस जारी करून २९ सप्टेंबरपर्यंत उत्तर मागविले आहे.
अशी आहे संपत्ती
दिलीप ग्वालबन्शीच्या नावे असलेल्या जप्त संपत्तीमध्ये कळमेश्वर तालुक्याच्या मौजा पिपळा (रिठी) येथील खसरा ७१, ७२ आणि ८० मधील ६.२० हेक्टर, येथीलच खसरा १०२ मधील ०.६० हेक्टर, मौदा तालुक्यातील खसरा ८६४ मधील ०.३५ हेक्टर, याच ठिकाणच्या खसरा ८५६, ८५७, ८५८, ९४४ आणि ९४५ मधील एकूण ७.७५ हेक्टर, मौजा गोरेवाडा येथील खसरा ८२/४ मधील ०.७८ हेक्टर, बोरगाव येथील खसरा ६१/३, ६१/४, ६१/५ मधील ४५०० चौरस मीटर, कामठी तालुक्यातील मौजा खैरी येथील खसरा १०८ मधील ३.५९ हेक्टर, गोरेवाडा खसरा ३०/२ मधील २.११ हेक्टर आणि ३१/२ मधील ०.६१ आणि मौजा हजारीपहाड येथील खसरा २/२ मधील ४ हेक्टर जमिनीचा समावेश आहे.
दिलीपची पत्नी शुभांगी हिच्या नावे असलेल्या जप्त संपत्तीमध्ये पिपळा (रिठी) येथील खसरा ६०, ६१/२ मधील १.३१ हेक्टर, खसरा ५९/१ मधील ०.९४, खसरा ५९/३ मधील ०.०४, खसरा ५८ मधील १.९८ हेक्टर, खसरा ७० मधील ३.७१ हेक्टर, खसरा ९५ मधील ३.३५ हेक्टर आणि येरला येथील खसरा ४/अ मधील २ हेक्टर जमिनीचा समावेश आहे. न्यायालयात सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल यांनी काम पाहिले.

Web Title: An armchair on the wealth of Gwalbanshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.