शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Nagpur; घरी औषधे शिल्लक आहेत? मग गरजूंना दान करा...तरुणाईचा स्तुत्य उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 08:30 IST

Nagpur News गरजूंना आवश्यक औषधी उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील काही तरुणांनी स्तुत्य उपक्रम राबविला आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून औषधांचे करा दान असे आवाहन केले आहे. गेल्या आठवड्यातच या उपक्रमाला सुरुवात झाली अन् २० ते २५ गरजूंना औषध त्यांनी पुरविले जाते आहे.

ठळक मुद्देगरीब रुग्णांना मिळवून देतात मोफत औषध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचे संक्रमण वाढत असताना औषधांचाही तुटवडा मोठ्या प्रमाणात भासतो आहे. त्यातच महागड्या औषधी गरीब गरजूंना घेणे अवघड आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, अशा गरजूंना आवश्यक औषधी उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील काही तरुणांनी स्तुत्य उपक्रम राबविला आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून औषधांचे करा दान असे आवाहन केले आहे. गेल्या आठवड्यातच या उपक्रमाला सुरुवात झाली अन् २० ते २५ गरजूंना औषध त्यांनी पुरविले जाते आहे.कोरोनाचा विळखा चांगलाच वाढल्याने घरोघरी रुग्ण आहेत आणि औषधीही आहेत. यातून जे रुग्ण बरे झाले आहेत, त्यांच्या शिल्लक औषधी घरीच पडून आहे. या तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याच औषधी दान करण्याचे आवाहन केले आहे. ही संकल्पना या ग्रुपमधील कुणाल पुरी यांना सुचली. त्यांच्या घरातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. ते बरे झाल्यानंतर शिल्लक औषधी घरातच पडून होत्या. महागड्या औषधी कुणाच्या तरी कामी याव्यात, या भावनेतून त्यांनी मित्रांपुढे ही संकल्पना व्यक्त केली आणि सोशल मीडियावर आवाहन करण्यात आले. अनेकांनी त्यांच्या उपक्रमाला प्रतिसाद दिला. त्यांनी शहरातील मित्रमंडळींना ज्यांना औषधांची गरज आहे. अशा लोकांसोबत संपर्क करायला लावला. हे तरुण औषधी गोळा करतात आणि डॉक्टरांच्या प्रीस्क्रीप्शननुसार गरजूंना औषधी उपलब्ध करून देतात.सोबतच या तरुणांनी ते राहत असलेल्या परिसरात औषधांची फवारणी सुरू केली आहे. दररोज सायंकाळी ही मंडळी फवारणीचे यंत्र घेऊन घरोघरी फवारणी करीत असतात. या उपक्रमात अश्विन धनविजय, गणेश कुटे, सुमित भालेकर, अजय डोंगरे, संदीप देशपांडे, रिषभ माहुले, मुकेश गजभिये यांचा सहभाग आहे.- आज घरोघरी कोरोनाचे रुग्ण आहेत. सर्वांनाच चांगले उपचार व औषधी मिळू शकत नाही. औषधी महाग असल्याने गरिबांनाही त्या परवडत नाही. आमच्या छोट्या उपक्रमातून गरीब रुग्णांचा औषधांचा खर्च वाचत असेल तर तेवढाच त्यांना आधार होईल.कुणाल पुरी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस