शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पोस्टमॅन आहेत काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 21:19 IST

वेश्या व्यवसायातील रॅकेट शोधण्यासाठी सखोल तपास न केल्यामुळे शहर पोलीस प्रशासनाला मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून अपरिपक्व आणि पोस्टमॅन असे झणझणीत ताशेरे सहन करावे लागले. पोलीस प्रशासन गांभीर्याने वागले नाही. परिणामी, न्यायालय संतप्त झाले होते.

ठळक मुद्देहायकोर्टाचे ताशेरे : वेश्या व्यवसायातील रॅकेट शोधण्यात अपयश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेश्या व्यवसायातील रॅकेट शोधण्यासाठी सखोल तपास न केल्यामुळे शहर पोलीस प्रशासनाला मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून अपरिपक्व आणि पोस्टमॅन असे झणझणीत ताशेरे सहन करावे लागले. पोलीस प्रशासन गांभीर्याने वागले नाही. परिणामी, न्यायालय संतप्त झाले होते.अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायातून बाहेर काढून त्यांचे पुनर्वसन करणे व अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात ढकलणारे रॅकेट नष्ट करणे यासाठी फ्रिडम फर्म या सामाजिक संस्थेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष सुनावणी झाली. संस्थेने राजस्थानमधील एका अल्पवयीन मुलीला गंगा जमुनातील वेश्या व्यवसायातून बाहेर काढले आहे. त्या मुलीचा ताबा घेण्यासाठी राजस्थानवरून एक व्यक्ती आली असून तो मुलीचा पिता असल्याचा दावा करीत आहे. परंतु, मुलीने व त्या व्यक्तीने न्यायालयाला स्वतंत्रपणे दिलेल्या माहितीमध्ये बरीच तफावत आहे. परिणामी, न्यायालयाने या दोघांचे नाते व मुलीच्या वयाची शहानिशा करण्यासाठी पोलिसांना राजस्थानमध्ये जाऊन रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे मिळविण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर पोलिसांनी राजस्थानमध्ये जाऊन केवळ कागदपत्रे गोळा केली. त्या आधारावर कोणताही तपास केला नाही.प्रकरणावरील सुनावणीदरम्यान, फ्रिडम फर्मचे वकील अ‍ॅड. निहालसिंग राठोड यांनी कागदपत्रांच्या आधारे दोघांचे नाते सिद्ध होत नसल्याचे व मुलीच्या वयाबाबतही विविध प्रश्न उपस्थित होत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. संबंधित व्यक्तीचे वकील अ‍ॅड. शशिभूषण वाहने यांनीही काही गंभीर त्रुटींकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यानंतर सरकारी वकील मेहरोज पठाण यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, पण न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी काढली. पोलीस प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. त्यांनी राजस्थानमध्ये जाऊन केवळ पोस्टमनची भूमिका बजावली व कागदपत्रे गोळा करून आणली. त्यावरून कोणत्याही प्रकारचा तपास केला नाही. मुलगी सज्ञान आहे की अल्पवयीन, तिचे व संबंधित व्यक्तीचे नाते काय आहे याची उत्तरे पोलिसांनी शोधली नाही. पोलीस प्रशासनाकडून परिपक्वतेची अपेक्षा असताना त्यांनी हा निष्काळजीपणा दाखवला असे मत न्यायालयाने व्यक्त केले.आयपीएस अधिकाऱ्याने योग्य माहिती द्यावीसामान्य पोलीस कर्मचाऱ्यांकडून आवश्यक सहकार्य न मिळाल्यामुळे उच्च न्यायालयाने आयपीएस अधिकाऱ्यांनी यासंदर्भात योग्य माहिती सादर करावी, असा आदेश दिला. आयपीएस अधिकाऱ्यांनी प्रकरणातील सर्व कागदपत्रे तपासावी व पुढच्या तारखेला अचूक उत्तरे द्यावीत असे न्यायालय म्हणाले. पुढील सुनावणी १५ मार्च रोजी निश्चित करण्यात आली असून तेव्हापर्यंत पीडित मुलीला करुणा शासकीय आश्रयालयात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर