शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

बँकांना फोनद्वारे लुटणारी टोळी उपराजधानीत सक्रिय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 10:09 IST

बड्या व्यापारी ग्राहकांच्या नावाने बँकांना फोन करून लुटणारी टोळी नागपुरात सक्रिय झाली असल्याचे संकेत मिळाले. गेल्या दोन दिवसात अशा प्रकारच्या दोन घटना समोर आल्या आहेत.

ठळक मुद्देबँक कर्मचाऱ्यांना सावध राहण्याची आवश्यकतास्टेट बँकेला पाच लाखांचा गंडा

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बड्या व्यापारी ग्राहकांच्या नावाने बँकांना फोन करून लुटणारी टोळी नागपुरात सक्रिय झाली असल्याचे संकेत मिळाले. गेल्या दोन दिवसात अशा प्रकारच्या दोन घटना समोर आल्या आहेत.पहिली घटना स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सोमलवाडा शाखेत मंगळवारी घडली. बँकेचे पासिंग आॅफिसर अनिल भालेराव यांना विशाल बरबटे यांच्या नावाने फोन करून त्यांच्या बरबटे नेक्सा शोरूमच्या खात्यातून पाच लाख रुपये उत्तर प्रदेशातील गजरौला येथील जिंदल पाईप्सच्या खात्यात ट्रान्स्र करण्याची विनंती केली. त्यावर भालेराव यांनी पाच लाख जिंदल पाईप्सला पाठवून दिले.थोड्यावेळाने त्याच फोनकर्त्याने भालेराव यांना फोन करून २,९८,००० रुपये पुन्हा तीन खात्यात पाठविण्याची विनंती केली. पण यावेळी भालेराव यांना शंका आल्याने त्यांनी बरबटे नेक्सा शोरूममध्ये संपर्क केला, तेव्हा अशी कुठलीही सूचना दिली नसल्याचे विशाल बरबटे यांनी सांगितले. भालेराव यांनी नंतर या रकमा पाठवल्या नाहीत. पण तरीही स्टेट बँकेला पाच लाखांचा फटका बसला आहे. स्टेट बँकेचे सोमलवाडा शाखा प्रमुख संदीप हजारे यांनी या प्रकरणाची तक्रार बुधवारी सोनेगाव पोलीस ठाण्यात केली असून तपास सुरू आहे. या प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच टेलिकॉमनगरमधील युनियन बँक आॅफ इंडियातही असाच प्रयत्न गुरुवारी झाला. शाखा व्यवस्थापक प्रतीककुमार यांना फोनकर्त्याने आपण अरुण फोर्ड शोरूमचे संचालक पाटणी बोलत असून आपल्या खात्यातून ६,५५,५१९ रुपये भोपाळ येथील आधार एंटरप्रायजेसच्या खात्यात पाठविण्याची सूचना दिली. प्रतीककुमार यांनी तसा ई-मेल पाठविण्याची विनंती फोनकर्त्याला केली. त्यावर फोनकर्त्याने कुणालपाटणी.फोर्ड@जीमेल.कॉम वरून तसा ई-मेल कुमार यांना केला. पण पाटणी कधीच फोनने बँक व्यवहार करत नसल्याने कुमार यांनी पाटणी यांच्याशी संपर्क साधला व हा बँकेला फसविण्याचा प्रयत्न असल्याचे सिद्ध झाले व युनियन बँकेची फसवणूक टळली.पाटणी यांनी नागपूर येथील सायबर सेलमध्ये तक्रार केली आहे. वाहन विक्रेत्यांच्या बँक खात्यात नेहमीच किमान ५० लाख ते तीन कोटीपर्यंत रक्कम जमा असते. त्यामुळे फोनकर्त्याने आॅटोमोबाईल डिलर्सना लक्ष्य केल्याचे उघड आहे. बरबटे व पाटणी या दोघांनी पोलिसात धाव घेतली. पण फसवणूक झाल्यानंतर तक्रार केली तर इज्जतीचा भाजीपाला होईल असा विचार करून गप्प बसणारेही असू शकतात. या प्रकारात खातेदारांनी फोन वा सूचना दिली नसल्याने रकमेबाबत पूर्ण जबाबदारी बँक अधिकाºयांची आहे. त्यामुळे बँक अधिकाऱ्यांना अशा फोनपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :bankबँक