शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरचे  आर्चबिशप अब्राहम विरूथकुलंगारा यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 23:28 IST

नागपूरचे रेव्हरंड आर्चबिशप अब्राहम विरुथकुलंगारा यांचे गुरुवारी दिल्ली येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर २३ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात येतील. ते सीबीसीआय सेंटर दिल्ली येथे आयोजित हिंदी बोलणाऱ्या बिशपांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गेले होते. त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांचे पार्थिव दिल्लीवरून विमानाने रात्री उशिरा नागपूरला आणण्यात आले.

ठळक मुद्दे २३ एप्रिल रोजी नागपुरातच अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूरचे रेव्हरंड आर्चबिशप अब्राहम विरुथकुलंगारा यांचे गुरुवारी दिल्ली येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर २३ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात येतील. ते सीबीसीआय सेंटर दिल्ली येथे आयोजित हिंदी बोलणाऱ्या बिशपांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गेले होते. त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांचे पार्थिव दिल्लीवरून विमानाने रात्री उशिरा नागपूरला आणण्यात आले.१९७७ मध्ये मध्य प्रदेशातील खंडवा येथे बिशप म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी त्यांचे वय केवळ ३४ वर्षांचे होते. त्यांचा जन्म ५ जून १९४३ रोजी केरळमध्ये झाला. १९६० मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर मध्य प्रदेशातील इंदूर येथे त्यांनी सेमिनरी जॉईन केली होती. २८ आॅक्टोबर १९६९ मध्ये त्यांना ‘प्रीस्ट’ घोषित करण्यात आले. यानंतर त्यांनी नागपुरातील सेंट चार्ल्स सेमिनरीमधून पुरोहितचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर तब्बल आठ वर्ष त्यांनी गोंड आदिवासींमध्ये समन्वयाचे कार्य केले. त्यांचे कार्य आणि समर्पणामुळे पोप यांनी त्यांच्यावर खंडवा येथील आदिवासी क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी सोपविली. संत मदर टेरेसा यांनी त्यांचे कौतुक करताना म्हटले होते की, ‘युवा आणि ऊर्जावान असलेल्या या प्रधान पादरीने आपल्या भाषेच्या प्राविण्याने हजारो लोकांचे जीवन बदलविले आहे’. तब्बल २१ वर्षे त्यांनी खंडवा येथे घालविले. यानंतर २२ एप्रिल १९८८ रोजी त्यांना नागपूरचे आर्चबिशप म्हणून पदोन्नती देण्यात आली. त्यांनी नागपूरला आपले मिशन ‘आर्किडियोसीस’ सुरू केले. ते कॅथोलिक बिशप युवा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. ते वेस्टर्न रिजन बिशपचे चेअरमनही राहिले आहेत.त्यांचे निधन एक मोठी क्षतीनागपूरचे आर्चबिशप रेव्हरंड अब्राहम विरुथकुलंगारा यांचे निधन मोठी क्षती आहे. ते आपल्या सिद्धांताचे पक्के होते. त्यांनी मध्य भारतातील मोठ्या समुदायासाठी धार्मिक विचारांचे नेतृत्व केले.बनवारीलाल पुरोहितराज्यपाल, तामिळनाडू 

 

टॅग्स :Deathमृत्यूAll saints cathedral Church Nagpurऑल सेंट कॅथेड्रल चर्च