शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

सर्वोच्च न्यायालयात जाणार पुरातत्त्व विभाग; नागपूर ओल्ड हायकोर्ट इमारत प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 12:41 IST

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशावरून सिव्हिल लाईन्सस्थित ओल्ड हायकोर्ट इमारत परिसरातील जुने बांधकाम तोडण्यात आले आहे. त्याविरुद्ध भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. नागपूर केंद्राने यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे गोळा केली आहेत.नागपूर केंद्राच्या अधीक्षक पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. आय. ए. हाश्मी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ...

ठळक मुद्देआवश्यक कागदपत्रे गोळा झाली

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशावरून सिव्हिल लाईन्सस्थित ओल्ड हायकोर्ट इमारत परिसरातील जुने बांधकाम तोडण्यात आले आहे. त्याविरुद्ध भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. नागपूर केंद्राने यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे गोळा केली आहेत.नागपूर केंद्राच्या अधीक्षक पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. आय. ए. हाश्मी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९४० मध्ये ब्रिटिश सरकारने ओल्ड हायकोर्ट इमारत व अन्य महत्त्वाचे बांधकाम केले होते. राज्य सरकारच्या निर्णयानुसार सर्व ऐतिहासिक इमारतींचे संवर्धन करणे आवश्यक आहे. उच्च न्यायालयानेही यासंदर्भात वेळोवेळी निर्देश दिले आहेत. त्यानंतरही उच्च न्यायालयाने गेल्या २६ मार्च रोजी ओल्ड हायकोर्ट परिसरातील जुने बांधकाम पाडण्याचा आदेश दिला. त्या आदेशात संबंधित बांधकामाला कॅन्टीन संबोधण्यात आले. परंतु, नागपूर केंद्राने येथील कॅन्टीन आधीच तोडली आहे. तोडलेले बांधकाम ओल्ड हायकोर्टच्या टंकलेखकांसाठी उभारण्यात आले होते. त्यामुळे ते बांधकाम कॅन्टीन होते हे उच्च न्यायालयाला कुणी सांगितले, हे स्पष्ट होणे आवश्यक झाले आहे. बांधकाम तोडण्यापूर्वी विभागाला माहिती विचारायला हवी होती. ही जागा अस्थायी पार्किंगसाठी दिली जाणार आहे. जुने बांधकाम तोडण्यासाठी नॅशनल मॉन्युमेंट अ‍ॅथॉरिटीची अनुमती आवश्यक असते. या प्रकरणात तशी परवानगी नाही.

आक्षेप व सूचना का नाही दिल्याप्राथमिक अधिसूचनेनंतर जाहिरातीद्वारे आक्षेप व सूचना मागविण्यात आल्या होत्या. परंतु, कुणीही अस्थायी पार्किंगसाठी सूचना केल्या नाहीत. अधिसूचनेमध्ये ओल्ड हायकोर्ट परिसराच्या १८ हजार २२८ वर्गमीटर क्षेत्रफळाचा उल्लेख आहे. उच्च न्यायालयाचा आदेश अवैध असून, त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.- डॉ. आय. ए. हाश्मी, अधीक्षक पुरातत्त्व शास्त्रज्ञ, नागपूर केंद्र.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय