शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कल चाचणीची विनाकारण ‘कलकल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:58 IST

गेल्या तीन वर्षांपासून दहावीनंतर विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाने कल चाचणीचा प्रयोग राबविला आहे. पहिल्याच वर्षी कलचाचणीच्या प्रमाणपत्रावर शिक्षणमंत्र्यांचा फोटो छापल्याने कलचाचणी वादात आली होती. यावर्षी कलचाचणी शिक्षण विभागाने न घेता, एका संस्थेला काम दिले आहे. दुसरीकडे शाळेत विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यावर बंधन असल्याने, कलचाचणी मात्र मोबाईलवर घेण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षात शिक्षकांच्या अनुभवातून कलचाचणीचा कुठलाही उपयोग विद्यार्थ्यांना होत नसतानाही शिक्षण विभागाकडून कलचाचणी रेटून धरत त्यात उगाच नवनवीन प्रयोग करून शिक्षकांची डोकेदुखी वाढवित आहे.

ठळक मुद्देदरवर्षी ठरतेय वादाचा विषय : मोबाईलवरील कलचाचणी ठरणार शिक्षकांसाठी डोकेदुखी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या तीन वर्षांपासून दहावीनंतर विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाने कल चाचणीचा प्रयोग राबविला आहे. पहिल्याच वर्षी कलचाचणीच्या प्रमाणपत्रावर शिक्षणमंत्र्यांचा फोटो छापल्याने कलचाचणी वादात आली होती. यावर्षी कलचाचणी शिक्षण विभागाने न घेता, एका संस्थेला काम दिले आहे. दुसरीकडे शाळेत विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यावर बंधन असल्याने, कलचाचणी मात्र मोबाईलवर घेण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षात शिक्षकांच्या अनुभवातून कलचाचणीचा कुठलाही उपयोग विद्यार्थ्यांना होत नसतानाही शिक्षण विभागाकडून कलचाचणी रेटून धरत त्यात उगाच नवनवीन प्रयोग करून शिक्षकांची डोकेदुखी वाढवित आहे.दहावीनंतर विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी १८ डिसेंबर ते १७ जानेवारी दरम्यान कल चाचणी घेण्यात येत आहे. यावर्षी कल चाचणीची जबाबदारी शामची आई फाऊंडेशन या संस्थेला दिली आहे. ही संस्था मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची कलचाचणी घेणार आहे. खासगी संस्थेला कलचाचणीने दिलेल्या अधिकारावर शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे. आतापर्यंत झालेल्या तीन कलचाचण्या शिक्षण मंडळाने घेतल्या होत्या. शासनाचा शिक्षण मंडळावर विश्वास राहिला नाही का, असा सवाल शिक्षकांनी केला आहे. कलचाचणीसाठी मोबाईलच्या वापरावरसुद्धा शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे. चाचणीसाठी मोबाईल कोण उपलब्ध करून देईल? यासाठी शिक्षकांनी आपला मोबाईल का वापरावा? विद्यार्थ्यांना घरचा मोबाईल आणण्यासाठी सांगितले तर त्याचे काय परिणाम होतील? मोबाईल वापराचे दुष्परिणाम समोर येत आहेत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास निर्बंध आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर टाळावा, असा आग्रह आणि विचार सगळीकडे सुरू असताना मोबाईलवर कलचाचणी घेतली जात आहे, असे विविध प्रश्न शिक्षण क्षेत्रातून विचारल्या जात आहे.आधी शिक्षण मंडळाकडून चाचणीसाठी सिडी दिली जात होती. त्याचा कालावधी ४० मिनिट होता. आता कलचाचणी सोबतच अभिक्षमता चाचणी देणे आहे. कालावधी १ तास ३० मिनिटांचा आहे. डिसेंबर महिना हा विद्यार्थ्यांना व शाळांसाठी फार महत्त्वाचा असतो. अभ्यासक्रम पूर्ण करणे, सराव परीक्षांचे नियोजन करणे, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षांचे नियोजन करणे व त्याद्वारे विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी तयार करण्याची कसरत शिक्षकांना करावी लागते. याकाळात कलचाचणीचे आयोजन करणे विद्यार्थी व शिक्षकांच्या हिताचे नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.कल चाचणीचा आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेता, विद्यार्थ्यांसाठी त्याची उपयुक्तता सिद्ध झाली नाही. ज्या गोष्टीची उपयुक्तता विशेष नाही शासन त्यावर जास्त भर देत आहे. परीक्षेचे दिवस जवळ असताना, अशा परीक्षा घेऊन शासन विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचीही डोकेदुखी वाढवित आहे.पुरुषोत्तम पंचभाई, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघटना

 

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा