शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात १६ एप्रिलला ओला, उबेर बंदचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 20:23 IST

शहरातील तरुणांना लाखो रुपये महिन्याचे आमिष दाखवून, त्यांना कर्जबाजारी करणाऱ्या टॅक्सी कंपन्या ओला व उबेर विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन छेडले आहे. येत्या १६ एप्रिल रोजी मनसेने ओला, उबेर टॅक्सी चालकांसोबत बंदचे आवाहन केले आहे. याला सर्व टॅक्सी चालक-मालकाचे समर्थन असल्याचे मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

ठळक मुद्देटॅक्सी कंपन्यांच्या आडमुठ्याधोरणा विरोधात मनसेचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील तरुणांना लाखो रुपये महिन्याचे आमिष दाखवून, त्यांना कर्जबाजारी करणाऱ्या टॅक्सी कंपन्या ओला व उबेर विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन छेडले आहे. येत्या १६ एप्रिल रोजी मनसेने ओला, उबेर टॅक्सी चालकांसोबत बंदचे आवाहन केले आहे. याला सर्व टॅक्सी चालक-मालकाचे समर्थन असल्याचे मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी पत्रपरिषदेत सांगितले.या टॅक्सी कंपन्यांनी नागपुरात आपला व्यवसाय सुरू करताना स्थानिक तरुणांना आमच्या सोबत व्यवसाय करा, लाख रुपयांपर्यंत महिना कमवा, अशी आमिष दाखविली होती. त्यामुळे मोठ्या संख्येने तरुणांनी कर्जबाजारी होऊन स्वत:ची वाहने घेतली. पुढे या कंपन्यांनी टॅक्सीचालकांचे कमिशन कमी केले. शिवाय स्वत:ची ओला-फिट ही टॅक्सी काढून व्यवसाय त्या टॅक्सीवर वळविला. त्यामुळे या टॅक्सी चालकांना आता महिन्याचा हप्ता भरणे सुद्धा कठीण झाले आहे. लाखो रुपये गुंतवून तरुणांची फसगत होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. यासंदर्भात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ओला कंपनीचे शहरातील प्रमुख विशाल गुप्ता यांच्याकडे गारहाणी सुद्धा मांडली. त्यांनी टॅक्सीचालकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी चार दिवसांचा अवधी मागितला होता. परंतु कुठल्याही तक्रारी सोडविल्या नाही. उबेर कंपनीच्या प्रमुखांना मनसेचे शिष्टमंडळ भेटण्यास गेले असता, त्यांना पोलिसांकडून रोखण्यात आले. तरुणांना कर्जबाजारी करणाऱ्या  टॅक्सी कंपन्यांचे मनमानी धोरण खपवून घेणार नाही, असा इशारा मनसेने दिला आहे. त्यासाठी १६ एप्रिलला बंद पाळण्यात येणार आहे. त्यानंतरही कंपन्यांनी गांभीर्याने न घेतल्यास, मनसे स्टाईल धडा शिकवू, असा इशारा गडकरी यांनी दिला. पत्रपरिषदेला चंदू लाडे, विशाल बडगे, अजय ढोके, श्याम पुनियानी, घनश्याम निखाडे, संगीता सोनटक्के, मनिषा पापडकर, उमेश उतखेडे, उमेश बोरकर, प्रशांत निकम, कपिल आवारे, सुजित वानखेडे, चंदन गुप्ता, किरण व्होलर, हर्षल हिरुळकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Olaओलाagitationआंदोलन