शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या स्थायी समितीची मंजुरी : २०० कोटींच्या कर्जाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 23:14 IST

राज्य सरकारकडून १५० कोटींचे विशेष अनुदान मिळाले. पुन्हा १७५ कोटींचे अनुदान मिळण्याची अपेक्षा आहे तसेच जीएसटी अनुदानात वाढ केली. परंतु महापालिकेचे मुख्य स्रोत असलेल्या विभागाकडून अर्थसंकल्पात अपेक्षित उत्पन्न ३१ मार्चपर्यंत तिजोरीत जमा होण्याची श्क्यता नाही. याचा विचार करता शहरातील सिमेंट रस्ते, अमृत योजना, मेट्रो मॉल व बुधवार बाजार येथील मॉल व अन्य प्रकल्पांचा खर्च करण्यासाठी महापालिका बँक ऑफ महाराष्ट्रकडून ९.७५ टक्के व्याजदराने २०० कोटींचे कर्ज घेणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

ठळक मुद्देसिमेंट रस्ते, अमृत, मेट्रो मॉलचे निर्माण करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारकडून १५० कोटींचे विशेष अनुदान मिळाले. पुन्हा १७५ कोटींचे अनुदान मिळण्याची अपेक्षा आहे तसेच जीएसटी अनुदानात वाढ केली. परंतु महापालिकेचे मुख्य स्रोत असलेल्या विभागाकडून अर्थसंकल्पात अपेक्षित उत्पन्न ३१ मार्चपर्यंत तिजोरीत जमा होण्याची श्क्यता नाही. याचा विचार करता शहरातील सिमेंट रस्ते, अमृत योजना, मेट्रो मॉल व बुधवार बाजार येथील मॉल व अन्य प्रकल्पांचा खर्च करण्यासाठी महापालिका बँक ऑफ महाराष्ट्रकडून ९.७५ टक्के व्याजदराने २०० कोटींचे कर्ज घेणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.प्रस्तावानुसार शहरातील सिमेंट रस्त्यांच्या टप्पा-२ व टप्पा-३ मधील कामे करण्यासाठी ५० कोटी उपलब्ध केले जातील. पाणीपुरवठा योजना अमृतसाठी ५० कोटी, मेट्रो मॉल, बुधवार बाजार, सक्करदरा बाजाराचा विकास करण्यासाठी ५० कोटी तर २४ बाय ७ योजनेसाठी ओसीडब्ल्यू कंपनीला ५० कोटी कर्जातून उपलब्ध केले जाणार आहे.विशेष म्हणजे कर्ज घेताना करण्यात आलेल्या करारानुसार ज्या प्रकल्पासाठी कर्ज घेतले जाईल त्याच प्रकल्पावर ही रक्कम खर्च करावयाची आहे. या कर्जासाठी सरकारकडून कोणत्याही प्रकारची हमी घेण्याची गरज नाही. यासाठी महापालिका व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यात एस्क्रो खात्यासाठी करार कराण्यात आला आहे.महापालिका प्रशासनातर्फे कर्ज घेण्याची प्रक्रिया गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून सुरू आहे. अखेर डिसेंबर २०१८ मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याशी करार करण्यात आला. व्याजदरात कपात करावी यासाठी चर्चा सुरू होती. परंतु बँक निर्धारित व्याजदर कमी करण्यास राजी झालेली नाही. त्यामुळे निर्धारित दराने व्याज द्यावे लागणार आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी सभागृहाकडे पाठविला जाणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर