शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

शिक्षण विभागात मान्यता घोटाळा : ६०३ शाळांमध्ये ७२२ शिक्षकांना मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 19:48 IST

जिल्ह्यात सातत्याने दरवर्षी अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढत असताना, जि.प.च्या माध्यमिक शिक्षण विभागाने २०१२ ते २०१६ या कालावधीत मोठ्या संख्येने वैयक्तिक मान्यता दिल्या. विशेष म्हणजे शासनाने २०१२ नंतर शिक्षकांची भरती बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयानंतरही मोठ्या संख्येने शिक्षकांना मान्यता देण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारात उघडकीस आले आहे. शासनाच्या आदेशाला डावलून वैयक्तिक मान्यता देण्याच्या प्रकरणात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे.

ठळक मुद्देमाहितीच्या अधिकारात उघड झाले सत्य

आॅनलाईन लोकमतनागपूर : जिल्ह्यात सातत्याने दरवर्षी अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढत असताना, जि.प.च्या माध्यमिक शिक्षण विभागाने २०१२ ते २०१६ या कालावधीत मोठ्या संख्येने वैयक्तिक मान्यता दिल्या. विशेष म्हणजे शासनाने २०१२ नंतर शिक्षकांची भरती बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयानंतरही मोठ्या संख्येने शिक्षकांना मान्यता देण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारात उघडकीस आले आहे. शासनाच्या आदेशाला डावलून वैयक्तिक मान्यता देण्याच्या प्रकरणात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे.शासनाने आॅक्टोबर २०११ मध्ये विशेष पटपडताळणी मोहीम राबविली. यात मोठ्या संख्येने शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने १०० टक्के अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी २ मे २०१२ रोजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांची भरती बंद केली. परंतु नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २०१२ ते २०१६ या काळात ७२२ शिक्षकांना मान्यता दिली तर १००० च्यावर शिक्षकांना अवैधरीत्या सेवासातत्य दिल्याचे माहितीच्या अधिकारात उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे २०१२-२०१६ या कालवधीत माध्यमिक शिक्षण विभागाात राघवेंद्र मुनघाटे, ओमप्रकाश गुढे, सतीश मेंढे हे शिक्षण अधिकारी होते. विभाग एकच पण माहितीत तफावतवेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाने माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीत जि.प.च्या माध्यमिक शिक्षण विभागात २०१२-२०१६ या काळात ७२२ शिक्षकांना वैयक्तिक मान्यता व एक हजारावर शिक्षकांना सेवासातत्य दिल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान याच कालावधीची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाला मागितली असता, विभागाने ३१२ शिक्षकांना वैयक्तिक मान्यता दिल्याची तसेच ९२ शिक्षकांना सेवासातत्य दिल्याबद्दल निर्देशसूची दिली. एकाच विभागाच्या दोन्ही कार्यालयात मान्यतेच्या व सेवासातत्याच्या आकडेवारीत तफावत दिसून आली आहे. मान्यतेच्या फाईल झाल्या गायबमाहिती अधिकार कार्यकर्ते विजय गुप्ता यांनी माध्यमिक शिक्षण विभागाला वैयक्तिक मान्यता व सेवासातत्याच्या अवलोकनासाठी अर्ज केला. माहिती आयोगाने अवलोकनाला मान्यता दिल्यावर शिक्षण विभागाने ३१२ शिक्षकांना मान्यता व ९२ शिक्षकांना सेवासातत्य दिल्याची नोंदसूची दिली. वेतन पथकाने दिलेल्या आकडेवारीनुसार वैयक्तिक मान्यतेच्या ३१० व सेवासातत्याच्या ९०० वर फाईल कार्यालयातून गायब झाल्याचे निदर्शनास आले.

 

टॅग्स :educationशैक्षणिकCorruptionभ्रष्टाचार