शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

३४६०४ कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी

By admin | Updated: May 19, 2015 02:10 IST

नागपूर शहराचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने सन २०४१ सालापर्यतचा ३४,६०४ कोटीच्या सुधारित शहर विकास

मनपा बैठक : राज्य सरकारकडे पाठविणार प्रस्तावनागपूर : नागपूर शहराचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने सन २०४१ सालापर्यतचा ३४,६०४ कोटीच्या सुधारित शहर विकास आराखड्याला सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. यात १२ विभागात गुंतवणूक प्रस्तावित आहे. हा आराखडा राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी घेण्यात आला.केंद्र सरकारच्या शहर विकास तसेच शहरी रोजगार व दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाने जागतिक बँकेच्या सहकार्याने नागरी विकास क्षमता बांधणी हाती घेतली आहे. यासाठी भारतातील काही शहरांची निवड करण्यात आली असून त्यात नागपूरचा समावेश आहे. २००६ च्या विकास आराखड्यात सुधारणा करून २०४१ पर्यतचा सुधारित आराखडा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या साहाय्याने मे. क्रिसील रिस्क अ‍ॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन लिमिटेड यांच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. शहरी विकास तसेच शहरी रोजगार व दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाचा जवाहरलाल नेहरू नागरी पुनरु त्थान अभियान अंतर्गत शहराचा सुनियोजित विकास साधण्यासाठी २००६ मध्ये शहर विकास आराखडा तयार करण्यात आला होता. या दृष्टीने विकासाचा प्रयत्न करण्यात आला. सुधारित शहर विकास आराखडा तयार करताना विविध सामाजिक संघटना, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, लोकप्रतिनिधी, शासकीय व गैरशासकीय संस्थांचे अधिकारी, यांच्या समक्ष आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले होेते. भविष्यातील शहराच्या गरजा विचारात घेता हा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती महापौर प्रवीण दटके यांनी दिली. (प्रतिनिधी)कर विभागाचे विभाजन मालमत्ता कराची वसुली व्हावी यासाठी विभागातील कर आकारणी व वसुली असे दोन विभाग करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मात्र या विभागाचे खासगीकरण करण्यात येणार नाही. नागपूर मनपात १९८९ मध्ये कर आकारणी व वसुली यासाठी वेगवेगळे कर्मचारी ठेवण्यात आले होेते. परंतु भोरकर समितीच्या अवहालामुळे विभागाचे एकत्रिकरण करण्यात आले होेते. सभेत विविध विभागातील पद भरती करण्याला मंजुरी देण्यात आली.कविवर्य राजा बढे चौकमहाल भागातील सी.पी.अ‍ॅन्ड बेरार महाविद्यालयासमोरील चौकाचे कविवर्य राजा बढे चौक असे नामकरण करण्याच्या प्रस्तावाला सभेत मंजुरी देण्यात आली. तसेच प्रभाग १२ मधील डॉ. राम मनोहर लोहिया वाचनालय परिसरात तयार करण्यात आलेल्या कक्षाला सम्राट अशोक कक्ष व पूर्ण परिसराला सम्राट अशोक अध्ययन केंद्र असे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. अशी होईल विकास कामेविभाग २०४१ पर्यत खर्च (कोटीत)पाणीपुरवठा ६७१सिवरेज व शौचालय१३६६रस्ते व वाहतूक २२०५३पावसाळी नाल्या ३६९२कचऱ्यावर प्रक्रिया३६८झोपडट्टी विकास ४८११पुरातत्त्व विकास ५३४पर्यटन विकास २०१ई-गव्हर्नस १६०सामाजिक उपक्रम १९४पर्यावरण ४५७आपत्ती निवारण ९५