शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
2
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
3
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
4
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
5
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
6
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
7
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
8
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
9
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
10
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
11
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
12
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
13
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
14
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
15
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
16
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
17
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
18
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
19
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
20
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मनपातील १२ कर्मचारी बडतर्फ, नियुक्ती अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 00:29 IST

न्यायालय आणि राज्य सरकार यांच्याशी दीर्घ लढा दिल्यानंतर अतिरिक्त ठरविण्यात आलेल्या १७ कर्मचाऱ्यापैकी १५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती मनपा प्रशासनाने ३ऑगस्ट २०१९ रोजी केली. परंतु अवघ्या १० महिन्यानंतर संबंधित नियुक्ती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अवैध ठरवून १२ कर्मचा ऱ्यां ना बडतर्फ करण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्देआयुक्तांनी आदेश जारी केला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: न्यायालय आणि राज्य सरकार यांच्याशी दीर्घ लढा दिल्यानंतर अतिरिक्त ठरविण्यात आलेल्या १७ कर्मचाऱ्यापैकी १५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती मनपा प्रशासनाने ३ऑगस्ट २०१९ रोजी केली. परंतु अवघ्या १० महिन्यानंतर संबंधित नियुक्ती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अवैध ठरवून १२ कर्मचा ऱ्यां ना बडतर्फ करण्याचे आदेश दिले. मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश धामेचा यांनी बडतर्फ करण्याचे आदेश काढल्याला पुष्टी दिली. अडतानी समितीच्या शिफारशींच्या आधारे ही नियुक्ती अवैध ठरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार अतिरिक्त ठरविण्यात आलेल्या १७ कर्मच्याऱ्यांपैकी एकाचा मृत्यू झाला. एक महिला कर्मचारी दुसरीकडे नोकरीला लागली. उर्वरित १५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा आदेश ३ ऑगस्ट २०१९ रोजी काढण्यात आला. संबंधित कर्मच्याऱ्यांनी ५ ऑगस्ट २०१९ रोजी मनपात पदभार स्वीकारला. १५ पैकी १० ग्रंथालय सहायक आणि ५ सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झाले. यातील दोन कर्मचारी सेवानिवृत्त झाले. एकाचा मृत्यू झालाने १२ कर्मचारी शिल्लक होते. यात ९ ग्रंथालय सहायक आणि ३ सुरक्षा रक्षक होते. १२ मे २०२० रोजी, नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे सांगत यावर मानपा प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना स्पष्टीकरण मागितले. बडतर्फ करण्याच्या आदेशामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. ते पुन्हा या निर्णयाला आव्हान देण्याच्या विचारात आहेत. या कर्मचाºयांनी सेवा ज्येष्ठतेसह इतर सुविधा मागितल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे.प्रकरण खूप जुने आहेसन १९९३ मध्ये मनपामध्ये भरतीसाठी जाहिरात काढली होती. भालचंद्र जोशी यांनी या प्रकरणात स्थगिती आणली. ९७ मध्ये स्थगिती हटविण्यात आली. त्यानंतर, कर्मचारी १२ सप्टेंबर ९७ रोजी रुजू झाले. ४ फेब्रुवारी २००२ रोजी मनपातील १०६ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. अडतानी समिती नियुक्त करण्यात आली. उच्च न्यायालयात शिफारशी ठेवण्यात आल्या. ते मान्य केल्यानंतर बरखास्तीची कारवाई करण्यात आली. बडतर्फ झालेल्या कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला अर्ज केला. प्रदीर्घ लढ्यात प्रकरण कधी न्यायालयात तर कधी राज्य सरकारपुढे चालले. सरकारने मनपामध्ये ८९ लोकांना नोकरीवर घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार ११ नोव्हेंबर २०१० रोजी रुजू झाले. यातील १७ कर्मचारी शिल्लक होते. त्यांनी पुन्हा संघर्ष सुरू केला. अखेर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची पुन्हा नियुक्ती करण्याची शिफारस केली. त्यानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारीsuspensionनिलंबन