शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महापालिकेत लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्त्या करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 15:20 IST

महापालिकेत लाड -पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित नियुक्त्या तातडीने करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत केली.  महापौर नंदा जिचकार यांनी याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिेले.

ठळक मुद्देमहापौरांचे निर्देश : वारस मुलींनाही घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेत लाड -पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित नियुक्त्या तातडीने करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत केली.  महापौर नंदा जिचकार यांनी याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिेले.समितीच्या शिफारशीनुसार २००३ -०४ मध्ये ८३० लोकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी दिली. सध्या ६०० हून अधिक अर्ज आलेले आहेत. ४५० पदे रिक्त आहेत. छाननी केली जात आहे. तातडीने नियुक्त्या करण्यात येतील.असे त्यांनी सांगितले. धरमपाल मेश्राम यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या वारस असलेल्या मुलींनाही सेवेत घेण्याची सूचना केली. दयाशंकर तिवारी, प्रवीण दटके , काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे आदींनी नियुक्तीला विलंब होत असल्यावर प्रकाश टाकला.इंदिरा गांधी रुग्णालयातील जैविक कचऱ्याची चौकशीइंदिरा गांधी रुग्णालयात उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या जैविक कचऱ्याचा प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून प्रफुल्ल गुडधे यांनी उपस्थित केला. यासंदर्भात ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित केले होते. यावर उत्तर देताना आयुक्त अश्विन मुदगल म्हणाले, गेल्या काही दिवसापूर्वी आरोग्य शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण नागपूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी आवश्यक दिशानिर्देश दिले होते. त्यानुसार इंदिरा गांधी रुग्णालयात उघड्यावर जैविक कचरा टाकला जात असेल तर या प्रकरणात नोटीस बजावून प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.१६ कर्मचाऱ्यांना घेणार सेवेतमुलाखत न घेता निवड करणे, अर्ज फेटाळल्यानंतरही निवड करणे अशा आरोपामुळे सेवेतून काढण्यात आलेल्या १६ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला़ विशेष म्हणजे मानवीय दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला़ सेवेत घेण्यात यावे, यासाठी हे १७ कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करीत होते़ ते शासनाकडे दाद मागण्यासाठी केले़ शासनाने महापालिकेला आपल्या स्तरावर निर्णय घेण्यास सांगितले होते़ त्यानुसार मनपाच्या सामाान्य प्रशासन विभागाने प्रस्ताव तयार केला आहे़ या प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली़ १७ पैकी एका कर्मचाऱ्यांचा मृत्य झाला आहे़हलबा कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नकामहानगरपालिकेतील २०० हलबा कर्मचाऱ्यांना जाती प्रमाणपत्र सादर करण्याकरिता नोटीस देण्यात आल्या आहेत़ प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांना सेवामुक्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे़ हे कर्मचारी कित्येक वर्षापासून महापालिकेच्या सेवेत आहेत़ महापालिकेने १७ कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे़  त्याचप्रमाणे हलबा कर्मचाऱ्यांनाही मनपाने अभय द्यावे, अशी मागणी अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांनी केली़ महालिका हलबा कर्मचाऱ्यांच्या पाठिशी असल्याचे सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी सांगितले.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर