शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर्मचाऱ्यांच्या बदली व पदोन्नतीसाठी समिती नेमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 23:19 IST

मनपातील कर्मचाऱ्यांची बदली आणि पदोन्नतीसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात यावी, असे निर्देश मनपाच्या विधी व सामान्य प्रशासन विशेष समितीच्या बैठकीत सभापती अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम यांनी दिले.

ठळक मुद्देविधी व सामान्य प्रशासन विशेष समितीच्या बैठकीत निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनपातील कर्मचाऱ्यांची बदली आणि पदोन्नतीसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात यावी, असे निर्देश मनपाच्या विधी व सामान्य प्रशासन विशेष समितीच्या बैठकीत सभापती अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम यांनी दिले.समितीचे सभापती अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ही बैठक मनपा मुख्यालय सिव्हील लाईन्स येथील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडली. यावेळी बोलताना सभापती अ‍ॅड. मेश्राम म्हणाले की, या समितीमध्ये अतिरिक्त आयुक्त, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, विधी व सामान्य प्रशासन समिती प्रमुख अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम, सहायक आयुक्त व विधी अधिकाºयांचाही समावेश करावा. सामान्य प्रशासन विभागाने पदोन्नती धोरणाचा आराखडा तयार करावा. त्यावर समिती निर्णय घेईल.बैठकीत उपसभापती मीनाक्षी तेलगोटे, सदस्य जयश्री वाडिभस्मे, सहायक आयुक्त महेश धामेचा, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, सहायक विधी अधिकारी आनंद शेंडे, प्रकाश परडे, सुरज पारोचे व इतर अधिकारी उपस्थित होते.अधिकाऱ्यांच्या ७० वाहनांवर दरवर्षी २.२५ कोटी रुपये खर्चयावेळी अ‍ॅड. मेश्राम यांनी स्टेशनरीवर दरवर्षी खर्च होणाऱ्या ५० लाख रुपयाच्या खर्चाची सविस्तर माहिती आणि अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या वाहनांची माहिती मागितली. सहायक आयुक्त धामेचा यांनी यावर सांगितले की, ७० वाहनांवर दरवर्षी २.२५ कोटी रुपये खर्च होतात. तसेच स्टेशनरीचा पुरवठा हा मागणीप्रमाणे केला जातो. मनपात सध्या १६० कॉम्प्युटर ऑपरेटर कार्यरत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.८२ टक्के प्रकरणाचा निकाल मनपाच्या बाजुनेविधी अधिकारी व्यंकटेश कपले यांनी विधी विभागाची माहिती देताना सांगितले की, यावर्षी ११८ प्रकरणांवर विविध न्यायालयात निकाल देण्यात आला आहे. यापैकी ८२ टक्के प्रकरणांचा निर्णय मनपाच्या बाजूने लागला आहे. सभापती अ‍ॅड. मेश्राम यांनी न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांवर लक्ष देण्याचे निर्देश दिले.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारी