शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे पार्सलवर कागदाऐवजी इलेक्ट्रॉनिक सील लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:35 IST

रेल्वेतून जाणाऱ्या  पार्सलवर सध्या कागदाचे सील ठोकून त्यावर पेनने लिहिले जाते. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने ते चुकीचे असून कागदाऐवजी इलेक्ट्रॉनिक मशीनने सील लावल्यास ते सोईचे होणार असल्याच्या गंभीर बाबीकडे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतिजा यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देसुरक्षा आयुक्तांनी वेधले रेल्वेमंत्र्यांचे लक्ष : आरपीएफ बॅरेक करणार सुसज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेतून जाणाऱ्या  पार्सलवर सध्या कागदाचे सील ठोकून त्यावर पेनने लिहिले जाते. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने ते चुकीचे असून कागदाऐवजी इलेक्ट्रॉनिक मशीनने सील लावल्यास ते सोईचे होणार असल्याच्या गंभीर बाबीकडे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतिजा यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे लक्ष वेधले.रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे रेल्वे अर्थसंकल्पात सुरक्षेवर भर देण्यात आला आहे. ३० जानेवारी रोजी दिल्ली येथे देशभरातील आरपीएफच्या सुरक्षा आयुक्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी नागपूर विभागातील वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतिजा यांनी इलेक्ट्रॉनिक सीलचा गंभीर विषय रेल्वे मंत्र्यांपुढे मांडला. रेल्वेस्थानकावर भिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यामुळे प्रवासी त्रस्त होतात. प्रवाशांचा त्रास दूर करण्यासाठी भिकाऱ्यांना रेल्वेगाड्या, स्टेशनबाहेर घालवून त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी त्यांनी केली. नागपूरसह देशभरातील आरपीएफ बॅरेकची सध्याची स्थिती, त्यांना मिळणाऱ्या सुविधा या मुद्यांकडे त्यांनी रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले. बॅरेकचा विषय रेल्वेमंत्र्यांनी गंभीरतेने घेऊन त्यावर त्वरित तोडगा काढण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे नागपूरसह देशभरातील बॅरेक सुसज्ज होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूर विभागात नागपूर आणि अजनी येथे आरपीएफ बॅरेक आहे. नागपुरात २० तर अजनी येथे ३० खाटांची संख्या आहे. सध्या अजनी बॅरेक अत्याधुनिक करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. या बॅरेकमध्ये बदली होऊन आलेले जवान राहतात. त्यांच्यासाठी प्रत्येकी एक बेड, गादी आणि आलमारी आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी जीम असतो. सतीजा यांच्या सूचनेमुळे देशभरातील आरपीएफ बॅरेकच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरnagpurनागपूर