शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

ज्येष्ठांच्या मदतीसाठी आले ‘अ‍ॅप’

By admin | Updated: June 15, 2016 03:06 IST

कधी काळी आई-वडिलांना देव मानणाऱ्या मुलांना त्यांचे वृद्धत्व ओझे वाटू लागले आहे. ज्येष्ठांच्या ‘आधाराची काठी’ होण्यापेक्षा त्यांच्या जगण्यावरच गदा आणली जात आहे.

अत्याचाराची तक्रार नोंदविताच मिळणार मदत : हेल्पेज इंडियाचा पुढाकारसुमेध वाघमारे नागपूरकधी काळी आई-वडिलांना देव मानणाऱ्या मुलांना त्यांचे वृद्धत्व ओझे वाटू लागले आहे. ज्येष्ठांच्या ‘आधाराची काठी’ होण्यापेक्षा त्यांच्या जगण्यावरच गदा आणली जात आहे. गेल्या वर्षी ‘हेल्प एज इंडिया’ संस्थेच्या अहवालात देशात ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचारात ५९ टक्के वाढ झाल्याची नोंद आहे. यावर उपाय म्हणून या संस्थेने ‘हेल्पेज एसओएस’ हे अ‍ॅप आणले आहे. या अ‍ॅपवर अत्याचार होत असल्याची माहिती देताच त्यांच्या मदतीसाठी चमू पोहोचणार आहे; सोबतच त्यांना आरोग्यापासून ते त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांचीही माहिती यातून मिळणार आहे.हेल्प एज इंडियाच्या २०१४ च्या अहवालात नागपुरात ८५ टक्के वृद्धांवरील अत्याचाराच्या नोंदी आढळल्या आहेत. गेल्या वर्षीच्या अहवालात तरुणांनीच मध्यमवर्गीयांमधील ज्येष्ठ सुरक्षित नसल्याचे म्हटले आहे. मुलगा, मुलगी व जावईच्या तुलनेत सुनबाईकडून ज्येष्ठांवर सर्वाधिक अत्याचार होत असल्याचे अहवालातून पुढे आले आहे. पोटच्या मुलांकडून ज्येष्ठांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण २७.९ टक्के आहे. मुलीकडून होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण २०.२ टक्के, जावयाकडून होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण १५.३ तर सुनबाईकडून होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण ५०.२ टक्के आहे. ज्येष्ठांशी उद्धट बोलण्याचे प्रमाण नागपुरात ८६.६ टक्के आहे. शारीरिक छळाचे प्रमाण ४६.३ टक्के आहे, तर ज्येष्ठांची आर्थिक कुंचबणा करण्याचे प्रमाण १९.५ टक्के आहे. या अ‍ॅपमुळे ज्येष्ठांना तत्काळ मदत मिळणार असल्याने, हे प्रमाण काहीसे कमी होण्याची शक्यता हेल्पेज इंडियाचे अधिकारी वर्तवीत आहेत. अत्याचाराची माहिती द्याया ‘अ‍ॅप’संदर्भात अधिक माहिती देताना ‘हेल्प एज इंडिया’ नागपूरचे व्यवस्थापक प्रमोद गणवीर, वरिष्ठ कार्यकारी हेमंत दानव यांनी सांगितले, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि त्यांना मदत करू इच्छिणाऱ्यांसाठी हे ‘अ‍ॅप’ मोलाचे ठरणार आहे. ‘अ‍ॅप’च्या एका क्लिकवर सामाजिक कार्यकर्त्यांची चमू त्यांच्य दारी पोहोचेल, तसेच जे ज्येष्ठांना मदत करू इच्छितात अशा युवकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करावे. त्यांनी केलेल्या तक्रारीची माहिती गुप्त ठेवण्यात येईल. या अ‍ॅपमुळे ज्येष्ठांवरील अत्याचारच कमी होणार नाही तर त्यांना आरोग्यापासून ते त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचीही माहिती यातून मिळणार आहे. हे ‘अ‍ॅप’ जागतिक ज्येष्ठ नागरिक शोषण जागरूकता दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी सर्व मेट्रो सिटीमध्ये लोकार्पण करण्यात आले.