लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराजबाग रोड आणि धीरन कन्या शाळा येथून सुटणाऱ्या शहर बसमुळे वाहतुकीची कोंडी होत होती. यावर उपाय म्हणून मातृसेवा संघ ते महाराजबागच्या मागून अमरावती मार्गाला जोडणाऱ्या नव्या डी.पी. रोडवरून शनिवारपासून विविध मार्गाच्या बसेस सुटतील. परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांच्या हस्ते शुक्रवारी याचा शुभारंभ करण्यात आला.नागपूर शहर बसचे संचालन सध्या बर्डी येथील महाराजबाग रोड, मोरभवन आणि धीरन कन्या शाळेजवळून होते. या दोन्ही मार्गांवर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. रस्त्याच्या कडेला बस उभ्या राहत असल्यामुळे रस्ता अरुंद होतो व वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे आता नव्या डी.पी. रोडवरून या बस सोडल्या जातील. या मार्गावर विविध फलाट तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी फलाट क्र. ६ वरून विविध मार्गावरील सुमारे ११७ बरफेऱ्या आणि फलाट क्र, ७ वरून ११८ बसफेऱ्या सुटतील. परिवहन सभापती कुकडे यांनी बर्डी-शेषनगर आणि बर्डी-बहादुरा फाटा या बसेसना हिरवी झेंडी दाखवून या मार्गाचा शुभारंभ केला. लवकरच या मार्गाला लागून नव्या शहर बसस्टॅण्डचा विकास होणार आहे. मोरभवन बसस्टॅण्डला ते जोडणार असून शहर बस सेवा अधिकाधिक लोकाभिमुख आणि प्रवाशांच्या सोईची करण्याचा मानस असल्याचे कुकडे यांनी या वेळी सांगितले.या बसफेऱ्या सुटतील- नवीन डी.पी. रोडवरून फलाट क्र. ६ वरून बर्डी-बहादुरा फाटा (७२ फेऱ्या) बर्डी-सुदामनगरी (८ फेऱ्या), बर्डी-नरसाळा (११ फेऱ्या), बर्डी-न्यू नरसाळा (१३ फेऱ्या), बर्डी-रमणामार्गे मेडिकल (१३ फेऱ्या), तर फलाट क्र. ७ वरून बर्डी-पिपळा गाव मार्गे बेसा फाटा (८ फेऱ्या), बर्डी-शेषनगर (१४ फेऱ्या), बर्डी-चक्रपाणीनगर (१५ फेऱ्या), बर्डी-वेळाहरी मार्गे बेसा फाटा (१५ फेऱ्या), बर्डी-खरसोली (४ फेऱ्या), बर्डी-अयोध्यानगर (साईमंदिर) (८ फेऱ्या), बेसा-गोरेवाडा (४७ फेऱ्या), बर्डी-बहादुरा गाव मार्गे खरबी (७ फेऱ्या), अशा एकूण २३५ फेऱ्या सुटतील.
नागपुरात नव्या डी.पी. रोडवरून सुटणार ‘आपली बस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:13 IST
महाराजबाग रोड आणि धीरन कन्या शाळा येथून सुटणाऱ्या शहर बसमुळे वाहतुकीची कोंडी होत होती. यावर उपाय म्हणून मातृसेवा संघ ते महाराजबागच्या मागून अमरावती मार्गाला जोडणाऱ्या नव्या डी.पी. रोडवरून शनिवारपासून विविध मार्गाच्या बसेस सुटतील. परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांच्या हस्ते शुक्रवारी याचा शुभारंभ करण्यात आला.
नागपुरात नव्या डी.पी. रोडवरून सुटणार ‘आपली बस’
ठळक मुद्दे परिवहन सभापतींनी बंटी कुकडे यांच्या हस्ते शुभारंभ : दोन फलाटावरून २३५ फेऱ्यांची सुरुवात