शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अ‍ॅन्टिजन टेस्टचा रिपोर्ट खराच असेल असे नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 10:22 IST

अ‍ॅन्टिजन टेस्ट निगेटिव्ह असेल आणि तरीदेखील रुग्णामध्ये लक्षणे आढळून येत असतील तर तात्काळ त्याने आरटी-पीसीआर टेस्ट करणे गरजेचे असल्याचे मुंबई मनपा आयुक्त इकबाल चहल यांनी सांगितले.

ठळक मुद्देआरटी-पीसीआर टेस्ट वाढविण्याचे आवाहनमुंबई मनपा आयुक्तांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई मनपा आयुक्त इकबाल चहल यांनी कोरोना संदर्भातील अ‍ॅन्टिजन टेस्टवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पॉझिटिव्ह आलेल्या अ‍ॅन्टिजन टेस्ट रिपोर्टवर कोणतीच शंका नाही. मात्र, जे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, ते चूक असू शकतात, असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.मुंबईहून नागपूरला आलेल्या तज्ज्ञ चमूचे सदस्य असलेल्या चहल यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना हा दावा केला आहे. अ‍ॅन्टिजन टेस्ट निगेटिव्ह असेल आणि तरीदेखील रुग्णामध्ये लक्षणे आढळून येत असतील तर तात्काळ त्याने आरटी-पीसीआर टेस्ट करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. निगेटिव्ह रिपोर्टसंदर्भात ही टेस्ट तेवढीशी कारगर नाही. पॉझिटिव्ह आलेल्या रिपोर्टमध्ये कोणतीच समस्या नाही. टेस्टची संख्या वाढविण्यापेक्षा त्याच्या गुणवत्तेवर अधिक जोर देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. मृत्यूदर कमी करण्यावर सर्वाधिक जोर देण्याचीही आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

बैठकीमध्ये चहल यांनी आरटी-पीसीआर टेस्ट वाढविण्यावर भर देत, अ‍ॅन्टिजन टेस्टचा उपयोग केवळ गंभीर स्वरूपात आजारी संशयित रुग्णासाठीच करण्यावर मत मांडले. यावेळी त्यांनी शासकीय व खासगी हॉस्पिटल्समध्ये वॉररूम तयार करण्याचे निर्देश दिले. सोबतच तक्रारींचा निपटारा करण्यासाठी, सीसीटीव्ही लावूनच उपचार करण्याचे आवाहन केले. बैठकीत पालकमंत्री नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त अमितेश कुमार, निवर्तमान पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते.मुंबईतल्या परिस्थितीची हाताळणीबैठकीत चमूने आपले अनुभव व्यक्त करताना धारावी आणि मुंबईच्या अन्य भागांमध्ये समन्वयाने काम पार पडले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: झोपडपट्टीमध्ये जाऊन स्थितीचा अंदाज घेतला. त्यामुळे, परिस्थिती आटोक्यात आणण्यास मदत मिळाली. नागपुरातही अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष दौरा करण्याची गरज आहे. ज्या पॉझिटिव्ह रुग्णांकडे वेगळे स्वच्छतागृह नाही किंवा कमी जागा आहे, त्यांच्या नातेवाईकांनाही क्वारंटाईन करावे लागेल.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस