शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

जादूटोणा विरोधी कायदा आता देशात व्हावा

By admin | Updated: April 24, 2017 02:03 IST

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा संमत केला आहे.

अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती : चिंतन बैठकीत निर्णय नागपूर : अंधश्रद्धा निर्मूलनासाठी महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा संमत केला आहे. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समितीही गठित करण्यात आली आहे. आता हा कायदा संपूर्ण देशात लागू व्हावा यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढाकार घेतला असून त्यादिशेने कामाला सुरुवातही झाली आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चिंतन बैठक विनोबा विचार केंद्र धरमपेठ येथे पार पडली. या बैठकीत समितीचे राष्ट्रीय संघटक प्रा शाम मानव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेश चौबे, राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर कांबळे, राष्ट्रीय महासचिव हरीश देशमुख, दिलीप सोळंके प्रा. शरद पाटील, अ‍ॅड. गणेश हलकारे, अ‍ॅड. गोविंदराव भेंडारकर, हरीभाऊ पाथोडे, किशोर वाघ, पुरुषोत्तम आवारे पाटील आदींसह देशभरातील पदाधिकारी सहभागी झाले होते. या चिंतन बैठकीत उपरोक्त विषयावर चर्चा करण्यात आली. समितीने यासंबंधीचा निर्णय आधीच घेतलेला आहे. प्रा. शाम मानव यांनी यासंदर्भात माहिती दिली. केंद्र स्तरावर हा कायदा कसा करता येईल, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी बैठकीत दिली. याशिवाय समितीच्या महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीवरही चर्चा झाली. महाराष्ट्रात संघटन बांधणीसाठी वर्षभराच्या कार्यक्रमाचे नियोजन ठरविण्यात आले. यामध्ये जादूटोणा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या कायद्याबाबतची जनजागृती प्रत्येक गावामध्ये करणे, यासाठी नर्स, पोलीस पाटील यांना प्रशिक्षण देणे, समितीच्या ग्राम शाखा नव्याने स्थापन करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवण्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे, शालेय अभ्यासक्रमात यासंबंधीचा अभ्यासक्रम सामील करून घेणे आदी कार्याचे नियोजन बैठकीत निश्चित करण्यात आले. (प्रतिनिधी)केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी चर्चा जादूटोणा विरोधी कायदा केंद्र स्तरावर लागू करण्यासंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक प्रा. शाम मानव यांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी दोन वेळा चर्चा झाली आहे. ते हा कायदा करण्यासंदर्भात सकारात्मक आहेत.