शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो स्टेशनवर अ‍ॅन्टी कोरोना औषधांची फवारणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 00:23 IST

महामेट्रोतर्फे कोरोना व्हायरसच्या प्रकोपाकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येत आहे. त्याअंतर्गत मेट्रो स्टेशनवर विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. प्रवाशांच्या सुविधा आणि सुरक्षेसाठी महामेट्रो प्रशासन सज्ज असून कोरोनामुळे आणखी काळजी बाळगली जात आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : महामेट्रोतर्फेकोरोना व्हायरसच्या प्रकोपाकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येत आहे. त्याअंतर्गत मेट्रो स्टेशनवर विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. प्रवाशांच्या सुविधा आणि सुरक्षेसाठी महामेट्रो प्रशासन सज्ज असून कोरोनामुळे आणखी काळजी बाळगली जात आहे.शनिवारी सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन, जयप्रकाशनगर, खापरी आणि लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनवर विशेष अभियान राबवून स्टेशन परिसराची साफसफाई आणि अ‍ॅन्टी कोरोना औषधांची फवारणी करण्यात आली. या कार्यात चार चमू कार्यरत होती. मेट्रो स्टेशन येथे कोरोना व्हायरसवर प्रवाशांना जागरूक करण्यासोबतच सुरक्षेसंबंधी बोर्ड तसेच बॅनर आणि पोस्टर लावण्यात आले आहेत. तसेच मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये उद्घोषकाद्वारे प्रवाशांना माहिती देण्यात येत आहे. त्यातच आणखी एक टप्पा पुढे जात शनिवारी विशेष फवारणी अभियान राबविण्यात आले.मेट्रो स्टेशनचे प्रवेशद्वार, सीडी, एक्सलेटर, लिफ्ट, प्रसाधनगृह ते तिकीट काऊंटर आणि परिसरमध्ये औषधांची फवारणी करण्यात आली. स्टेशनवर कार्यरत कर्मचाऱ्यांकरिता २०० मास्क आणि हातमोज्याचे वितरण करण्यात आले. प्रवाशांना स्वच्छता ठेवण्यासंबंधीची माहिती देण्यात आली. महामेट्रो प्रशासनाकडून विशेष अभियान निरंतर सुरू राहणार आहे. अ‍ॅन्टी कोरोना स्टेरिगार्ड औषधाची फवारणी विशेष प्रकारचे कपडे आणि मास्कद्वारे करण्यात आली. मेट्रो रेल्वेमध्ये स्वच्छता ठेवण्याकरिता कर्मचारी कार्यरत आहे. महाव्यवस्थापक सुधाकर उराडे यांच्या नेतृत्वात विशेष अभियान राबविण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाMetroमेट्रो