शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

उत्तर द्या, अन्यथा ११० कोटी जमा करा : हायकोर्टाचा सरकारला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 01:21 IST

समता सहकारी बँकेचे मुख्य अवसायक पंकज वानखेडे हे ठेवीदारांचे हित जपण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागेवर सक्षम व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी अशा विनंतीसह ठेवीदार कृती समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात न्यायालयाने आवश्यक वेळ देऊनही राज्य सरकार उत्तर सादर करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला फटकारून येत्या २६ नोव्हेंबरपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. तसेच, या आदेशाचे उल्लंघन झाल्यास न्यायालयात ११० कोटी रुपये जमा करण्याची तंबी दिली.

ठळक मुद्देसमता सहकारी बँक घोटाळा प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समता सहकारी बँकेचे मुख्य अवसायक पंकज वानखेडे हे ठेवीदारांचे हित जपण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागेवर सक्षम व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी अशा विनंतीसह ठेवीदार कृती समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात न्यायालयाने आवश्यक वेळ देऊनही राज्य सरकार उत्तर सादर करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला फटकारून येत्या २६ नोव्हेंबरपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. तसेच, या आदेशाचे उल्लंघन झाल्यास न्यायालयात ११० कोटी रुपये जमा करण्याची तंबी दिली.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यामुळे रिझर्व्ह बँकेने २००६ मध्ये समता बँकेचे सर्व बँकिंग व्यवहार बंद करण्याचा आदेश जारी केला होता. त्यानंतर २२ डिसेंबर २००६ रोजी सहकार आयुक्तांनी तत्कालीन सहायक निबंधक चैतन्य नासरे यांची बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती केली. नासरे यांनी केलेल्या लेखा परीक्षणातून बँकेत १४५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे पुढे आले. त्या आधारावर बँक संचालकांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला. राज्य गुन्हे अन्वेशन विभागाने सखोल तपास करून संचालकांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दरम्यान, २२ मार्च २०१० रोजी बँकेचे लायसन्स रद्द करण्यात आले. सहकार आयुक्तांनी बँक गुंडाळण्याचा आदेश जारी करून अवसायानाची कार्यवाही करण्यासाठी अवसायक मंडळ स्थापन केले. नासरे यांची मुख्य अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर नासरे यांनी १५ हजार ठेवीदारांना ३८ कोटी रुपये परत केले. ते अतिशय उत्तम पद्धतीने कार्य करीत होते. असे असताना १६ आॅक्टोबर २०१६ रोजी पंकज वानखेडे यांची मुख्य अवसायकपदी नियुक्ती करण्यात आली. परंतु, वानखेडे यांनी एक वर्ष विलंबाने सूत्रे स्वीकारली. तेव्हापासून त्यांनी ठेवीदारांच्या हिताचे काहीच निर्णय घेतले नाही. अद्याप एकही पैसा वसूल करून ठेवीदारांना देण्यात आला नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयGovernmentसरकार