शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 22:19 IST

स्थापनेची १४ वर्षे पूर्ण करण्याच्या तयारीत असलेल्या सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नागपूरकर डॉ. मृणालिनी फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण व प्रशासकीय क्षेत्रात कार्य करण्याचा दांडगा अनुभव असलेल्या डॉ.फडणवीस यांच्यावर विद्यापीठ वर्तुळातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राज्यातील तीन महत्त्वाच्या विद्यापीठांच्या कुलगुरूपदी नागपूरकर कुलगुरू असून आता डॉ. फडणवीस यांच्या निवडीमुळे शिक्षणक्षेत्रात नागपूरची मान आणखी उंच झाली आहे.

ठळक मुद्देमृणालिनी फडणवीस सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू राज्यातील चार विद्यापीठांत नागपूरकर कुलगुरू

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्थापनेची १४ वर्षे पूर्ण करण्याच्या तयारीत असलेल्या सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नागपूरकर डॉ. मृणालिनी फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण व प्रशासकीय क्षेत्रात कार्य करण्याचा दांडगा अनुभव असलेल्या डॉ.फडणवीस यांच्यावर विद्यापीठ वर्तुळातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राज्यातील तीन महत्त्वाच्या विद्यापीठांच्या कुलगुरूपदी नागपूरकर कुलगुरू असून आता डॉ. फडणवीस यांच्या निवडीमुळे शिक्षणक्षेत्रात नागपूरची मान आणखी उंच झाली आहे.राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी गुरुवारी डॉ.मृणालिनी फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली. डॉ.फडणवीस यांनी मध्य प्रदेश राज्यातील सागर येथील डॉ. हरिसिंग गौर विद्यापीठ येथून अर्थशास्त्र विषयात ‘एमए’ केले. त्यानंतर त्यांनी ‘एकॉनोमेट्रिक्स ’या विषयात पीएच.डी. प्राप्त केली. १९८१ साली विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्फत ‘जेआरएफ’साठी त्यांची निवड झाली होती. १९८८ मध्ये त्यांची महिला महाविद्यालय, नंदनवन येथे नियुक्ती झाली. मागील ३० वर्षांपासून त्या अध्यापनाचे कार्य करत आहेत.२००३ पासून त्या महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या आहेत.अखेर मिळाली संधीप्राचार्यपदाच्या कार्यकाळातदेखील त्यांच्या कामाचे बरेच कौतुक झाले व महिला महाविद्यालयात त्यांनी बरेच सकारात्मक बदल घडवून आणले. गेल्या अनेक वर्षांपासून विविध विद्यापीठांच्या कुलगुरूपदाच्या प्रबळ दावेदार म्हणून त्यांचे नाव घेण्यात येत होते. नागपूर विद्यापीठासाठीदेखील त्यांचे नाव आघाडीवर होते. मात्र प्रत्येक वेळी त्यांची संधी हुकत गेली. अखेर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली.अर्थशास्त्राच्या अभ्यासक म्हणून ओळखडॉ.मृणालिनी फडणवीस यांचा अर्थशास्त्रावर सखोल अभ्यास असून देशविदेशात त्यांची ख्याती आहे. त्यांनी अर्थशास्त्रावर पुस्तकेदेखील लिहिली आहेत विशेष म्हणजे विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्यादेखील त्या तज्ज्ञ सदस्या होत्या. याशिवाय अर्थशास्त्राशी संबंधित विविध समित्यांवर काम करण्याचादेखील त्यांना अनुभव आहे. नागपूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवरदेखील त्यांनी काम केले आहे.संघ परिवारात सक्रियडॉ.मृणालिनी फडणवीस या संघ परिवारात सक्रिय आहेत. शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या संघ परिवारातील विविध संघटनांच्या कार्यक्रमांत त्यांचा नेहमीच सहभाग असतो. अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.चांदेकर, ‘एसएनडीटी’च्या कुलगुरू डॉ.वंजारी हेदेखील संघ परिवारातीलच असून मुख्यालयाच्या शहरातूनच तीन लागोपाठ नियुक्त्या झाल्या आहेत, हे विशेष.

टॅग्स :universityविद्यापीठSolapurसोलापूर