नागपूर: काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील 'एसबीएल' कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील जखमींवर उपचार सुरू असताना, आज शुक्रवारी आणखी एका महिला कामगाराचा मृत्यू झाला. काळजाचा थरकाप उडवणाºया दुर्घटनेतील एकूण मृतांची संख्या आता २० वर पोहोचली आहे. सध्या १६ रुग्ण उपचार घेत असून यातील दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
१ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटानंतरनागपूरच्या आॅरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे १८ जखमींना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी दुर्गा केशव सेवतकर (४२) यांचा आज, ६ मार्च रोजी सकाळी ८:१३ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुर्गा या ६० टक्के भाजल्या होत्या. यापूर्वी २ मार्च रोजी रंजना उत्तम घागरे (३४) यांचा मृत्यू झाला होता, तर एक रुग्ण 'ब्रॉट डेड' आणला गेला होता.
जखमींची प्रकृती चिंताजनक; दोघी व्हेंटिलेटरवर
रुग्णालयात दाखल असलेल्या अनेक महिलांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. आॅरेंज सिटी हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, मयुरी हरिश्चरण धुर्वे (२४) या ४५ टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर 'ट्रॅकीओस्टोमी' करण्यात आली असून त्यांना सध्या व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. आम्रपाली अनिल काळसर्पे (३६) या ५५ टक्के भाजल्या असून त्यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यादेखील व्हेंटिलेटरवर आहेत. रोशनी उमाटे या ७५ टक्के भाजल्या असून त्यांच्या पायाच्या फ्रॅक्चरवर 'एक्स्टर्नल फिक्सेशन' करण्यात आले आहे. ७० टक्के जळालेल्या सीमा विजय धुर्वे यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली असून बरगड्यांना फ्रॅक्चर झाले आहे.
Web Summary : Another woman succumbed to injuries from the SBL company blast in Raulgav, Katol, raising the death toll to 20. Sixteen remain hospitalized, with two on ventilators due to critical burns and injuries sustained in the March 1st explosion. Many are in serious condition.
Web Summary : काटोल के राऊलगव में एसबीएल कंपनी के विस्फोट में घायल एक और महिला की मौत हो गई, जिससे मृतकों की संख्या 20 हो गई। सोलह अभी भी अस्पताल में हैं, जिनमें से दो वेंटिलेटर पर हैं, क्योंकि 1 मार्च के विस्फोट में गंभीर रूप से जल गए थे और घायल हो गए थे। कई गंभीर हालत में हैं।