शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

नागपुरातील गॅंगस्टर आंबेकरविरुद्ध आणखी एक गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 23:08 IST

कुख्यात गुंड संतोष शशिकांत आंबेकर याने एका हत्याकांडात सहआरोपी असलेल्या त्याच्या टोळीतील एका गुन्हेगारालाही धमकी देऊन त्याच्याकडून लाखो रुपये उकळल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देटोळीतील साथीदारालाही फसवले : ११ लाखांची खंडणी उकळलीमंत्रालयात आणि न्यायालयात एक कोटी खर्च घातल्याची मखलाशी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात गुंड संतोष शशिकांत आंबेकर याने व्यापारी उद्योजक, नोकरदार यांची फसवणूक करून त्यांच्याकडून तर खंडणी वसूल केलीच. मात्र,एका हत्याकांडात सहआरोपी असलेल्या त्याच्या टोळीतील एका गुन्हेगारालाही त्याने धमकी देऊन त्याच्याकडूनही आंबेकरने लाखो रुपये उकळल्याचे स्पष्ट झाले आहे. तहसील पोलीस ठाण्यात जयभारत काळे (वय ४३) नामक व्यक्तीने तशी तक्रार नोंदवताच पोलिसांनी आरोपी संतोष आंबेकर (वय ४९), राजेंद्र ऊर्फ राजा गुलाबराव अरमरकर (वय ५३) आणि नीलेश ज्ञानेश्वर केदार (वय ३४) या तिघांविरुद्ध अवैध सावकारीचा गुन्हा दाखल आहे.विशेष म्हणजे, आंबेकरने काळे याच्याकडून रक्कम उकळताना त्याला ही रक्कम मंत्रालय तसेच न्यायालयात वापरण्यात आली, त्याचमुळे एका हत्याकांडात निर्दोष सुटका झाल्याचे म्हटल्याचे पोलीस रेकॉर्डवर आले आहे. या घडामोडीमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे.कधी काळी चांगला मित्र असलेला मात्र एका व्यवहारामुळे विरोधात गेलेला कुख्यात गुंड बाल्या गावंडे याची कुख्यात संतोष आंबेकरने सावजीच्या माध्यमातून हत्या करवून घेतली होती. या हत्याकांडाचा मास्टर मार्इंड संतोष आंबेकरच होता, मात्र तो फरार झाला. या गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत आंबेकर फरारच होता. पुरावे नसल्यामुळे या हत्याकांडातील आरोपींना दोषमुक्त करण्यात आले. त्यानंतर संतोषने डिसेंबर २०१८ मध्ये पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. या हत्याकांडात जयभारत काळे हा देखील आरोपी होता. बाल्याच्या खुनातून जामिनावर बाहेर येण्यासाठी, आपल्या बाजूने निर्णय देण्यासाठी न्यायाधीशाला, मोक्काची कारवाई न करण्यासाठी मुंबई मंत्रालयात एक कोटी रुपये खर्च केले, असे संतोषने जयभारत काळे याला सांगितले होते. त्यातील १५ लाखांची रोकड काळेला परत मागितली होती. पैसे नसल्याने काळेला आंबेकरचा राईट हॅण्ड सराफा राजू अरमरकर याच्याकडून व्याजाने १५ लाख रुपये घेतल्याचे संतोषने सांगितले. या रकमेच्या व्याजापोटी आरोपी राजू अरमरकर आणि संतोषचा भाचा नीलेश केदार हे दर महिन्याला ३ टक्के व्याजदराने काळेकडून ४५ हजार रुपये उकळत होते. व्याजाची रक्कम देण्यास एक दिवस उशीर झाला तर त्यासाठी प्रति दिवस एक हजार रुपये जास्त घेतले जायचे.शिवीगाळ करून धमकीही द्यायचे. अशाप्रकारे सराफा अरमरकर आणि नीलेश केदार यांनी काळेकडून आतापर्यंत ११ लाख २५ हजार रुपये उकळले होते. दर महिन्याला ४५ हजार रुपये देणे शक्य नसल्यामुळे आणि पोलिसांनी आंबेकरविरुद्ध कडक कारवाई सुरू केल्याने काळेला हिंमत आली. त्यामुळे त्याने मंगळवारी तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी कलम ३८६, ५०४, ५०६ (ब), ३४ आणि सावकारी कायद्याचे सहकलम ४४,४५ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचाही तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर