शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अवैध सावकार सागर दोशी विरोधात आणखी एक गुन्हा दाखल

By योगेश पांडे | Updated: August 2, 2024 15:23 IST

Nagpur : दुसऱ्या प्रकरणात कर्जदाराला जीवे मारण्याची धमकी देत अव्वाच्या सव्वा पैसे वसूल

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनमानी पद्धतीने व्याज आकारणी करत कर्जदाराला मुलांच्या किडन्या विकून पैसे वसूल करेन अशी धमकी देणाऱ्या अवैध सावकाराविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या प्रकरणात त्याने कर्जदाराला जीवे मारण्याची धमकी देत अव्वाच्या सव्वा पैसे वसूल केले व शेतीचे विक्रीपत्र स्वत:च्या नावे करून घेतले. अंबाझरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज नायडू (५७, टिकेकर रोड, धंतोली) यांना आर्थिक अडचण असल्याने त्यांनी १ मार्च २०१६ ते १२ फेब्रुवारी २०२० या कालावधीत अवैध सावकार सागर जयेंद्रकुमार दोशी (३५, नरेंद्रनगर) याच्याकडून अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओंकार भवन येथे १० टक्के व्याजाने १३ लाख रुपये घेतले होते. त्याने त्यावर अव्वाच्या सव्वा व्याज आकारायला सुरुवात केली. त्याने नायडू यांना जीवे मारण्याची धमकी देत अतिरिक्त पैशांची मागणी केली. दबाव आणून त्याने त्यांच्याकडून ऑनलाईन माध्यमातून साडेपंधरा लाख व रोख १०.७८ लाख घेतले. त्यानंतर व्याजाचे १२ लाख रुपये शिल्लक असल्याचे सांगत त्याने नायडू यांची वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील शेती गहाण ठेवायची आहे असे खोटे सांगत त्यांच्या शेतीचे विक्रीपत्र स्वत:च्या नावे करून घेतले. त्यानंतर आरोपीने त्यांच्या खात्यात १० लाख रुपये जमा केले व धमकी देत ते रोख माध्यमातून त्यांच्याकडून घेतले. नायडू यांचे धंतोलीतील घर गहाण ठेवण्यासाठी त्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करत अनेक धमक्या दिल्या. अखेर नायडू यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेत आपबिती मांडली होती. नायडू यांच्या तक्रारीवरून दोषीविरोधात अंबाझरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियम तसेच भारतीय दंड विधानाच्या कलम २९४, ५०६(बी), ३८४, ३८५, ३८६, ३८७, ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर