शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शालार्थ आयडी घोटाळ्यात असाही बूमरँग, अपात्र मुख्याध्यापकाविरोधात तक्रार करणारा संस्थाचालकच अटकेत

By योगेश पांडे | Updated: June 24, 2025 23:35 IST

एसआयटीच्या चौकशीत अडकला : ४८ शिक्षकांचा तयार केला बनावट शालार्थ आयडी

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : शालार्थ आयडी घोटाळ्यात एसआयटीला आणखी एक यश मिळाले आहे. तब्बल ४८ शिक्षकांच्या नावाने बनावट शालार्थ आयडी तयार करणाऱ्या संस्थाचालकाला अटक करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे संबंधित संस्थाचालकाने त्याच्या शिक्षण संस्थेचे बनावट लेटरहेड वापरून अपात्र मुख्याध्यापक पराग पुडकेने पद मिळविल्याची तक्रार केली होती. आता त्याच्यावरच हे प्रकरण उलटले असून, त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

ओंकार भाऊराव अंजीकर (वय ४६, बाळाभाऊपेठ) असे अटक करण्यात आलेल्या संस्थाचालकाचे नाव आहे. अंजीकरची शांतिनिकेतन शैक्षणिक संस्था आहे. त्या संस्थेमार्फत गुलशननगर येथील जय हिंद विद्यालय, एस.के.बी. हायस्कूल यांच्यासह तीन शाळा चालविल्या जातात. २०१९ पासून अंजीकरा यांनी सुमारे ३० शिक्षकांचे शालार्थ आयडी मंजूर करण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केली. त्यासाठी त्याने शिक्षकांकडून पैसे घेतले. नंतर, प्रत्येक शिक्षकाकडून त्यांचे थकीत वेतन मिळावे यासाठी १० लाख रुपयेही घेतले. वेतन पथकाचे अधीक्षक नीलेश वाघमारे याच्या मदतीने अंजीकरने बनावट शालार्थ आयडी तयार केले. जेव्हा सायबर पोलिसांनी बनावट आयडींची चौकशी सुरू केली तेव्हा अंजीकरच्या शाळेत हे ३० व अगोदरचे १८ असे ४८ बनावट शालार्थ आयडी तयार झाल्याची बाब समोर आली. पोलिसांनी सापळा रचून सोमवारी रात्री अंजीकरला केली. त्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याला २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

एसआयटीच्या जाळ्यात अडकलेला चौथा संस्थाचालक

अंजीकर हा या घोटाळ्यात अटक झालेला चौथा शाळा संचालक आहे. याअगोदर चरण चेटुले, राजू मेश्राम व दिलीप धोटे या तिघांना अटक करण्यात आली होती.

पराग पुडकेविरोधात अंजीकरने केली होती तक्रार

अपात्र असूनदेखील बनावट दस्तऐवजांचा वापर करून मुख्याध्यापक पद मिळविणाऱ्या पराग पुडकेला एप्रिल महिन्यात सदर पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक केली होती. त्याची ओंकार अंजीकरनेच सर्वांत अगोदर शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे तक्रार केली होती. पुडकेने अंजीकरच्याच एस. के. बी. हायस्कूल येथे १ ऑगस्ट २०१७ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत कार्यरत असल्याचे अनुभव प्रमाणपत्रदेखील तयार करून दिले होते. त्यावर मुख्याध्यापिकेची बोगस स्वाक्षरीदेखील होती. अंजीकरने ऑगस्ट २०२३ मध्येच उपसंचालक कार्यालयाकडे तक्रार केली होती. आता शिक्षणक्षेत्राशी निगडित दुसऱ्या मोठ्या घोटाळ्यात स्वत: अंजीकर अडकल्याने आणखी मोठ्या लिंक समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी