शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या मणप्पुरम गोल्ड दरोड्यातील आणखी एका आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 21:38 IST

मणप्पुरम गोल्डच्या कार्यालयातून ३० किलो सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्या बिहारमधील सुबोध सिंह गँगचा आणखी एक सदस्य जरीपटका पोलिसाच्या हाती लागला.

ठळक मुद्देसुबोध सिंह गँगचा सदस्य : जरीपटका पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मणप्पुरम गोल्डच्या कार्यालयातून ३० किलो सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्या बिहारमधील सुबोध सिंह गँगचा आणखी एक सदस्य जरीपटका पोलिसाच्या हाती लागला. या प्रकरणात १७ महिन्यानंतर पोलिसांनी केलेली ही दुसरी अटक आहे. रोशन कुमार मिथिलेश प्रसाद (३०) रा. नालंदा, बिहार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.२८ सप्टेंबर २०१६ रोजी जरीपटकातील भीम चौकात बंदुकीच्या जोरावर बिहार येथील कुख्यात दरोडेखोर सुबोध सिंह याने आपल्या साथीदारांच्या मदतीने मणप्पुरम गोल्डच्या कार्यालयात दरोडा टाकून ३० किलो सोने व रोख रक्कम लुटून नेली होती.सुबोध सिंह गँगने अनेक राज्यांमध्ये गोल्ड लोन देणाऱ्या अनेक संस्थांच्या कार्यालयांवरही असेच दरोडे टाकले आहेत. ही घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली होती. सुबोध सिंह हा कुख्यात असल्याने त्याची लवकर ओळख पटली. त्याच्या शोधासाठी गुन्हे शाखा आणि जरीपटका पोलीस अनेकदा बिहारला जाऊन आले. परंतु त्याचा कुठलाही पत्ता लागला नाही. सुबोधच्या पत्नीला अटक करण्यात आली. ती सुद्धा जामिनावर सुटल्यापासून गायब आहे. एक महिन्यापूर्वी बिहारमधील स्पेशल टास्क फोर्सने (एटीएफ) सुबोध सिंहला पकडले. त्याच्याजवळून २० किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. तो पकडल्यामुळे त्याचे इतर साथीदारही सापडण्याची शक्यता बळावली होती. जरीपटका येथील दरोड्या प्रकरणाबाबतही सुबोधला विचारपूस झाली आहे. त्याने सांगितल्यानुसार नागपूरमध्ये दरोडा टाकल्यानंतर तो व त्याचा साथीदार मनीष सिंह हे वाराणसीला निघून गेले होते.अटक करण्यात आलेला आरोपी रोशन कुमार हा सुबोधचा मावस भाऊ असून तोही या टोळीचा सदस्य आहे. रोशन टॅक्सी चालवतो. वाराणसीवरून पटण्याला जाण्यासाठी सुबोधने रोशन कुमारला बोलावले होते. त्याच्या टॅक्सीमध्ये ते पटण्याला गेले. १२ हजार रुपये भाडेही दिले. सुबोधने बिहार पोलिसांना ही गोष्ट संगितली. बिहारच्या एसटीएफने रोशनचा शोध घेतला असता सुबोध गायब झाल्यापासून तोही गायब असल्याचे आढळून आले. बिहार एसटीएफ आणि जरीपटका पोलिसांनी शोधमोहिम हाती घेतली. रोशन कुमार परत आल्याचे माहीत झाले. या आधारावर सोमवारी संयुक्त कारवाईद्वारे त्याला अटक करण्यात आली.

टॅग्स :GoldसोनंRobberyदरोडा