शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

बाजारगाव शिवा फाटा येथे पुन्हा अपघात, भरधाव कार दुभाजकावर आदळली

By जितेंद्र ढवळे | Updated: September 6, 2023 13:51 IST

अभियंत्यासह त्याची पत्नी जखमी 

नागपूर :नागपूर-अमरावती महामार्गावरील बाजारगाव नजीकच्या शिवा फाट्यावर बुधवारी सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास पुन्हा अपघात घडला. यात अमरावती येथून नागपूरकडे जाणारी भरधाव कार अनियंत्रित झाल्याने ती दुभाजकावर आदळली. यात कारचालक प्रकाश हरी महाजन (६४) हे गंभीर तर त्यांच्या पत्नी विशाखा प्रकाश महाजन (५४) रा. अमरावती या किरकोळ जखमी झाल्या.

नागपूर-अमरावती महामार्गावरील बाजारगाव फाटा येथे आजवर ५० हून अधिक अपघात झाले आहेत. यात काही जणांचा जीवही गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश महाजन हे सॉफ्टवेअर अभियंता असून ते पत्नी विशाखा यांच्या सोबत एम.एच.-०१- ई.एफ. ७२१० क्रमांकाच्या कारने अमरावती येथून नागपूरकडे येत होते. बाजारगाव नजीकच्या शिवा फाटा येथे पुढच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात प्रकाश महाजन यांचा कारच्या स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने  ती दुभाजकावर आदळली. त्यात महाजन हे गंभीर जखमी झाले तर त्यांची पत्नी किरकोळ जखमी झाली.

अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटना स्थळाकडे धाव घेत दोघांनाही कार मधून बाहेर काढले. त्यांना बाजारगाव येथील रुग्णवाहिकेद्वारे नागपूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारा करिता पाठविण्यात आले. या प्रकरणी कोंढाळी पोलीस गुन्हा नोदविला असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर