शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वार्षिक पगारवाढ व महागाई भत्ता द्या : नागपुरात जिल्हा सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 21:38 IST

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँक एम्प्लॉईज युनियनने गुरुवारी तीव्र निदर्शने केली. कर्मचारी पाच दिवस निदर्शने करणार असून मागण्या मान्य न केल्यास ५ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.

ठळक मुद्देप्राधिकृत मंडळाचा बेकायदेशीर निर्णय

लोकमत  न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँक एम्प्लॉईज युनियनने गुरुवारी तीव्र निदर्शने केली. कर्मचारी पाच दिवस निदर्शने करणार असून मागण्या मान्य न केल्यास ५ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.२५ फेब्रुवारी २०१० च्या आदेशानुसार मागण्या मान्य करण्यात आल्या असून बँक व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटनेत २ फेब्रुवारी २०११ ला करार करण्यात आला आहे. करारानंतरही संघटनेला स्थगितीची कुठलीही पूर्वसूचना न देता आणि व्यवस्थापनाला अधिकार नसताना एप्रिल २०१४ पासून नियमित सुरू असलेली वार्षिक पगारवाढ आणि मे २०१५ पासून महागाई भत्ता रोखण्यात आला. ही बाब ध्यानात येताच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी मार्च-२०१८ च्या ताळेबंदात या देयकाची तरतूद केली होती.बँकेचे प्राधिकृत मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी रोखण्यात आलेली वार्षिक पगारवाढ आणि महागाई भत्ता सप्टेंबर २०१८ च्या पगारात लागू केली आणि यापोटी देय असलेल्या फरकाची रक्कम कशा प्रकारे देता येईल याचा प्रस्ताव संघटनेकडून मागविण्यात आला होता. फरकाची रक्कम ठेवी आणि रोखीच्या स्वरुपात देण्याचा प्रस्ताव संघटनेने दिला होता. तसेच सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी १० सप्टेंबर २०१८ रोजी नागपुरात प्राधिकृत मंडळासोबत झालेल्या चर्चेदरम्यान वार्षिक पगारवाढ आणि महागाई भत्ता रोखता येत नसल्याचे स्पष्ट करून प्राधिकृत मंडळावर ताशेरे ओढले होते.पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, ३१ मार्च २०१८ रोजी बँकेला ३४.६० कोटी रुपयांचा चलित नफा झाला असून बँकेचा सीआरएआर १५.७० टक्के आहे. नफ्यातून फरकाच्या रकमेची तरतूद करण्यात आली असतानाही बँक कर्मचाऱ्यांना रक्कम अदा करीत नाही. कर्मचाऱ्यांची रक्कम बँकेला दुसरीकडे वापरायची असल्याचे दिसून येते.बँकेच्या प्रगतीसाठी कर्मचारी कटिबद्ध असल्याची ग्वाही संघटनेने दिली असतानाही बँक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. प्राधिकृत मंडळाचे अध्यक्ष प्रवीण वानखेडे यांनी कर्मचाºयांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी केली.आंदोलनात युनियनचे पदाधिकारी विजय शहाणे, चंद्रकांत रोठे, किशोर आसटकर, मिलिंद घोडमाडे, जयंता आदमने, प्रशांत साळुंखे, शरयू काळबांडे, प्रकाश मेश्राम, प्रशांत डहाके, रमेश इंगोले, प्रमोद फुलबांधे, अनुप पाटील, जेठानी, बाळू ढोबळे, विजय भोसले आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Employeeकर्मचारीagitationआंदोलन