नागपूर : शिवसेनेच्या नागपूर शहर विधानसभानिहाय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशांनंतर संपर्कप्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांनी कार्यकारिणी जाहीर केली.
पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्राचे संघटक म्हणून श्रीकांत कौकाडे व समन्वयकपदी अजय दलाल यांची नियुक्ती झाली आहे. तर अंगद हिरोदे, अंकुश भोवते, हरीश रामटेके, गौरव महाजन यांची विभागप्रमुखपदी निवड झाली आहे. उपमहानगरप्रमुखपदी नाना झोडे, योगेश गोन्नाडे असून मध्य नागपूर विधानसभा क्षेत्राचे संघटक व समन्वयक म्हणून पुरुषोत्तम कांद्रीकर व शेखर खरवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर नागपूर व पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राच्या संघटकपदाची जबाबदारी अनुक्रमे ओमप्रकाश यादव व राम कुकडे यांच्याकडे देण्यात आली आहे. दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे संघटक म्हणून मिलिंद महादेवकर यांच्याकडे जबाबदारी आहे. तर संजय गुप्ता समन्वयक आहेत.