अनिरुद्ध ठरला ‘सूर नवा ध्यास नवा’चा महाविजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 10:31 AM2018-04-09T10:31:32+5:302018-04-09T10:31:43+5:30

महाराष्ट्र संगीत रत्न, सारेगमप यासारख्या मोठ्या स्पर्धा जिंकणाऱ्या अनिरुद्ध जोशी या नागपूरकर गायकाने शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, एका मराठी वाहिनीवरील अत्यंत गाजलेल्या ‘सूर नवा ध्यास नवा’ या स्पर्धेचा तो महाविजेता ठरला आहे.

Aniruddha wins 'Sur Nava Dhasna Nava', the grand all-rounder | अनिरुद्ध ठरला ‘सूर नवा ध्यास नवा’चा महाविजेता

अनिरुद्ध ठरला ‘सूर नवा ध्यास नवा’चा महाविजेता

Next
ठळक मुद्देनागपूरला मिळाली ‘मानाची कट्यार’महाअंतिम फेरीत चौघांना टाकले मागे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जन्मजात लाभलेला गोड गळा अन् गायनातील नावीन्यपूर्ण प्रयोगांमुळे महाराष्ट्र संगीत रत्न, सारेगमप यासारख्या मोठ्या स्पर्धा जिंकणाऱ्या अनिरुद्ध जोशी या नागपूरकर गायकाने शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, एका मराठी वाहिनीवरील अत्यंत गाजलेल्या ‘सूर नवा ध्यास नवा’ या स्पर्धेचा तो महाविजेता ठरला आहे.
८ एप्रिल रोजी मुंबईमध्ये पार पडलेल्या या महाअंतिम फेरीत परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मते या दोन्ही बाजूंवर अनिरुद्ध अव्वल ठरला. नागपूरकर रसिकांनी अनिरुद्धला भरभरून मते दिली. या महाअंतिम फेरीत अनिरुद्धबरोबर निहिरा जोशी, शरयू दाते, प्रसेनजित कोसंबी आणि विश्वजित बोरवणकर हे तगडे स्पर्धक होते. या स्पर्धेचे परीक्षण महेश काळे, अवधूत गुप्ते आणि शाल्मली खोलगडे यांनी केले. पं. हृदयनाथ मंगेशकर आणि सचिन पिळगावकर हे महाअंतिम सोहळ्याचे प्रमुख पाहुूणे होते. अनिरुद्धने या कार्यक्रमात सुरवातीपासून अप्रतिम गाणी सादर करून पाच वेळा कट्यार मिळविली होती. महाअंतिम फेरीत तर ही कट्यार कायमची त्याची झाली.


ही स्पर्धा माझ्यासाठी एक मोठे स्वप्न होते. मी या स्पर्धेचा महाविजेता ठरल्याने ते साकार झाले आहे. यापुढे गायक आणि संगीतकार म्हणून मला कारकीर्द घडवायची आहे. माझ्या या सांगितिक प्रवासात नागपूरकर रसिकांनी मला नेहमीच साथ दिली. यावेळीसुद्धा त्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला. नागपूरकरांचे माझ्यावरील हे प्रेम बघून मी भारावून गेलो आहे.
- अनिरुद्ध जोशी

Web Title: Aniruddha wins 'Sur Nava Dhasna Nava', the grand all-rounder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :musicसंगीत