शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

प्राण्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाहीच; पशुतज्ज्ञांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 10:16 AM

पशुतज्ज्ञांच्या मते कोरोनाचा विषाणू सजीव नाही आणि हा आजार झोनॅटीक नाही. त्यामुळे माणसांकडून प्राण्यांमध्ये जाण्याचा धोका अजिबात नाही.

ठळक मुद्दे आधीपासूनच आजाराची लस उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अमेरिकेमध्ये प्राणिसंग्रहालयातील वाघाला कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या बातमीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आपल्या अवतीभवतीच्या प्राण्यांना कोरोनाची लागण झाली तर काय, ही भीती बहुतेकांमध्ये निर्माण झाली आहे; मात्र अवतीभवतीच्या पाळीव प्राण्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाहीच, असा दावा पशुवैद्यकांनी केला आहे. कोरोना विषाणूने जगभरातील अनेक देशांमध्ये महामारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मानवी अस्तित्वाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा आजार माणसांकडून पशूंमध्ये गेला तर ही भीती व्यक्त केली जात आहे. अशात वाघाला कोरोनाची लागण झाल्याच्या माहितीने अधिकच शंका निर्माण केली आहे. मात्र पशुतज्ज्ञांच्या मते कोरोनाचा विषाणू सजीव नाही आणि हा आजार झोनॅटीक नाही. त्यामुळे माणसांकडून प्राण्यांमध्ये जाण्याचा धोका अजिबात नाही, असा दावा करण्यात येत आहे. पशुवैद्यक डॉ. नितीन शेंडे यांनी सांगितले, कोविड हा दोन प्रकारचा असतो. यामध्ये इंटेन्साईनल म्हणजे पोटाचा आणि दुसरा श्वसनाचा आजार होय. यातील पोटाचा कोरोना हा प्राण्यांमध्ये आढळून येतो. विशेषत: परदेशातून आणलेल्या कुत्रे किंवा मांजरांच्या प्रजातीत हा आजार दिसून येतो. देशी प्राण्यांमध्ये अद्यापतरी कोरोनाचा शिरकाव झाल्याचे दिसून आले नाही. विशेष म्हणजे प्राण्यांमध्ये होणाऱ्या कोरोनासाठी अनेक वर्षांपासून लस उपलब्ध आहे आणि घरी पाळण्यात येणाऱ्या प्राण्यांना ही लस देण्यात येते. गावठी कुत्रे किंवा मांजरांमध्ये तो आढळत नाही. सध्या दिसून येणारा कोरोनाचा विषाणू नवीन आहे, मात्र तो झोनॅटीक नाही, त्यामुळे प्राण्यांमध्ये शिरकाव होण्याची शक्यता कमीच आहे. याशिवाय विदर्भात तापमान अधिक असल्याने कोरोनाचा फैलाव अधिक होण्याची शक्यता वाटत नाही. त्यामुळे कुत्रे, कोंबड्या, बकरे आदींमधून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो, ही केवळ अफवा आहे, असे मत डॉ. शेंडे यांनी व्यक्त केले. त्यामुळे घाबरण्याचे कुठलेही कारण नाही, असा दावा त्यांनी केला.

- अमेरिकेत वाघाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आश्चर्यकारक आहे. कोरोना असेल असे वाटतही नाही. मात्र कोरोना असल्याचे सिद्ध झाल्यास तो संशोधनाचा विषय आहे. मात्र सध्यातरी पाळीव प्राण्यांमध्ये नवीन कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता दिसून येत नाही.- डॉ. नितीन शेंडे, पशुरोगतज्ज्ञ

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस