शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
2
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
3
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं करण कळताच पती हादरला!
4
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
5
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
6
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
7
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
8
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
9
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
10
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
11
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
12
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
13
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
14
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
15
Mumbai: विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेची जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव
16
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
17
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
18
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
19
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
20
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे

गणेश भक्तांच्या मार्गात जनावरांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:30 IST

शहरातील प्रमुख मार्गासह अंतर्गत मार्गावरही जनावरे ठिय्या मांडतात. यामुळे मूर्ती बघण्यासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.

ठळक मुद्देशहरातील मार्गावर ठाण : वर्दळीच्या भागात अपघाताचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात सध्या गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. गणेश मंडळांच्या मोठ्या मूर्ती बघण्यासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. शहरातील अर्धवट सिमेंट कांक्रिट रोडमुळे आधीच वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे. त्यात आता मोकाट जनावरांची भर पडली आहे. शहरातील प्रमुख मार्गासह अंतर्गत मार्गावरही जनावरे ठिय्या मांडतात. यामुळे मूर्ती बघण्यासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.नागपूर शहरात १५ ते १६ हजार जनावरे आहेत. बहुसंख्य गोपालक जनावरांना मोकाट सोडतात यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होण्यासोबतच शेणामुळे रस्त्यांवर घाण पसरते. याला आळा घालणारी सक्षम यंत्रणा महापालिकेकडे नाही. इंदोरा, अजनी, झिंगाबाई टाकळी, पारडी, वर्धमानगर, महाल, अंबाझरी ते अमरावती रोड, फुटाळा तलाव परिसर, मानेवाडा रोड, सक्करदरा, गोपालनगर, त्रिमूर्तीनगर, सोनेगाव व वाठोडा यासह शहराच्या विविध भागात मोकाट जनावरांचा वावर आहे.जनावरे मोकट सोडली म्हणून पशुपालकांवर कारवाई केली जात असल्याचा दावा महापालिकेच्या कोंडवाडा विभागाकडून केला जातो. मात्र प्रत्यक्षात कारवाई करण्यासाठी या विभागाकडे सक्षम यंत्रणाच नाही. मनुष्यबळ व वाहनांचा अभाव असल्याने कारवाईला मर्यादा आहेत. मोकाट जनावरांमुळे रहदारीला अडथळा होण्यासोबतच घाणीची समस्या निर्माण झाली आहे.शहरातील सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यांवर घाण करणाऱ्या कुत्र्यांना व जनावरांना आळा घालण्याची जबाबदारी उपद्रव शोध पथकावर सोपविण्यात आल्याचा दावा केला जातो. परंतु या पथकांकडे अतिक्रमण, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, घाण पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे या पथकाकडून पुन्हा मोकाट जनावरांच्या गोपालकांचा शोध घेण्याची जबाबदारी सोपविल्यास ही समस्या सुटणार नाही.दंड आकारूनही समस्या कायमपशुपालकांनी जनावरे मोकाट सोडू नये यासाठी पहिल्या वेळेस त्यांना दंड आकारला जातो. मात्र दुसऱ्यांदा त्याच पशुपालकाने जनावर मोकाट सोडल्याचे आढळून आल्यास दंड आकारून गुन्हा दाखल करण्याची तरतूद नागरी क्षेत्रात जनावरे पाळणे व त्याची ने-आण करण्याबाबतच्या १९७६ च्या कायद्यात आहे. परंतु या कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. फक्त दंड आकारण्याची कारवाई केली जात असल्याने समस्या कायम आहे.पावसाळ्याच्या दिवसात समस्या गंभीरपावसाळ्याच्या दिवसात जनावरे कोरड्या जागेत ठिय्या मारतात. त्यामुळे रस्त्यांवरील कोरड्या जागेत जनावरे बसतात. गोपालक जनावरांना रात्रीलाही गोठ्यात बांधत नसल्याने ते रस्त्यावर बसून असतात. यामुळे अपघाताचा धोका असतो. पथदिवे बंद असल्यास अनेकदा दुचाकीस्वार जनावरांवर जाऊन जखमी होण्याच्या घटना घडतात.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाnagpurनागपूर