शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

Maharashtra Assembly Election 2019 : नाराज कोहळे गडकरींच्या दारी  : समर्थक उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 22:07 IST

दक्षिण नागपुरातून उमेदवारी न दिल्यामुळे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. अन्याय झाल्याच्या नाराजीतून कोहळे यांनी बुधवारी दुपारी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निवासस्थानच गाठले.

ठळक मुद्देउमेदवारी न मिळाल्यामुळे पक्षाविरोधातच निदर्शने

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दक्षिण नागपुरातून उमेदवारी न दिल्यामुळे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. अन्याय झाल्याच्या नाराजीतून कोहळे यांनी बुधवारी दुपारी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निवासस्थानच गाठले. यावेळी त्यांनी गडकरी यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. दुसरीकडे कोहळे यांच्या समर्थकांनी दक्षिण नागपुरात भाजपविरोधातच निदर्शने केली व रस्त्यांवर नाराजीचा सूर उमटला.

मंगळवारी जाहीर झालेल्या भाजपच्या यादीत दक्षिण नागपूरचे तिकीट मोहन मते यांना देण्यात आले. त्यानंतर कोहळे यांच्या समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानी एकत्रित येत नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊन असे प्रतिपादन कोहळे यांनी मंगळवारी केले होते. बुधवारी सकाळी परत कोहळे यांचे कार्यकर्ते एकत्रित आले. नाराज कार्यकर्त्यांनी उदयनगर चौकात बराच वेळ निदर्शने केली व रास्ता रोको करण्याचादेखील प्रयत्न केला. त्यानंतर कोहळे हे आपल्या समर्थकांसह नितीन गडकरी यांच्या रामनगर येथील निवासस्थानी पोहोचले. यावेळी त्यांनी आपल्या भावना गडकरी यांच्यासमोर मांडल्या. माझ्यावर अन्याय झाला असल्याचे त्यांनी सांगितले. गडकरी यांनी कोहळे यांची समजूत काढली व निराश न होण्याचा सल्ला दिला.दरम्यान, मध्य नागपुरातून प्रवीण दटके यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांचे नाराज समर्थकदेखील गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचले. गडकरी यांनी शिष्टमंडळाची भेट घेतली व त्यांची समजूत काढून त्यांना शांत केले.हा कार्यकर्त्यांचा अपमान : कोहळेहा माझ्या एकट्यावर झालेला अन्याय नाही. तर कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय व अपमान आहे. दक्षिण नागपुरच्या विकासासाठी कार्यकर्ते पाच वर्षे अक्षरश: झटले. चांगले काम करूनही आता मला तिकीट न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत, अशी प्रतिक्रिया सुधाकर कोहळे यांनी दिली. दक्षिण नागपुरातून अपक्ष उभे राहणार का असा प्रश्न केला असता कार्यकर्ता जे म्हणतील त्यानुसार पुढील पावले उचलण्यात येतील असे त्यांनी उत्तर दिले.कोहळे समर्थकांची नाराजी स्वाभाविक : मतेसुधाकर कोहळे यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. त्यातून प्रतिक्रिया उमटतातच व ही बाब स्वाभाविकदेखील आहेत. परंतु कोहळे व त्यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी मी दूर करेल. यासाठी कोहळे यांची भेटदेखील घेईल. सर्व कार्यकर्ते निवडणूकीत प्रामाणिकपणे पक्षाचे काम करतील, असा विश्वास मोहन मते यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sudhakar Kohaleसुधाकर कोहळेagitationआंदोलन