शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

कंगनाच्या 'त्या' वक्तव्यावरून संताप; मनोरुग्णालयात दाखल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 16:04 IST

अभिनेत्री कंगना राणौतच्या वादग्रस्त विधानानंतर ठिकठिकाणी रोष व्यक्त केला जात आहे. नागपुरात तर कंगना ही मनोरुग्ण असून तिला मनोरुग्णालयात दाखल करा, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.

ठळक मुद्देकंगनाला बाबा ताजुद्दीन मनोरुग्णालयात दाखल करण्याचे निवेदन!

नागपूर : अभिनेत्री कंगना रणौतने भारताला १९४७ साली भीक मिळाली व स्वातंत्र्य २०१४ साली मिळाले, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. तिच्या या विधानानंतर सर्वत्र टीकेची झोड उडत आहे. तर, नागपुरात मात्र, कंगना मनोरुग्ण असून तिला मनोरुग्णालयात दाखल करण्याची मागणी सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. 

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत राहणारी कंगना रणौत यंदाही वादात सापडली आहे. तिने भारताला १९४७ साली भीक मिळाली व स्वातंत्र्य २०१४ साली मिळाले, असे वादग्रस्त विधान केले होते. तिच्या या विधानावरून देशभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. तसेच काही ठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे. तिचा पद्मश्री पुरस्कार राष्ट्रपतींनी काढून घ्यावा आणि तिच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा, अशीही मागणी होत आहे. 

नागपुरातही कंगनाच्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. इतकेच नव्हे तर, कंगनाची मानसिक स्थिती बिघडली असून तिला उपचारासाठी मनोरुग्णालयात दाखल करा अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदनही मनोरुग्णालय अधिक्षकांना देण्यात आले आहे.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतmental hospitalमनोरूग्णालय