शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

- अन् मुख्यमंत्री ठाकरे काही क्षण स्तब्ध होतात तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 22:40 IST

सूर्यास्तावेळी विधान भवनातून मुख्यमंत्री ठाकरे बाहेर पडत असताना विधान भवनावरील राष्ट्रध्वज उतरविणे सुरु होते. हे ठाकरे यांच्या लक्षात येताच ते विधानभवन परिसरात थांबले. राष्ट्रध्वज संहितेचे पालन करीत ध्वज उतरविल्यानंतर ते विधानभवनातून बाहेर पडले.

ठळक मुद्देराष्ट्रध्वज संहितेचे केले पालन : मानवंदवना दिली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मुद्यावर विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे विधिमंडळाचे कामकाज मंगळवारी दिवसाभरासाठी तहकूब करण्यात आले. यानंतर दिवसभर सत्ताधारी आणि विरोधकात शेतकऱ्याच्या मुद्यावर कलगीतुरा रंगला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाचा मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी दुपारी समाचारही घेतला.दिवसभराच्या गोंधळात मुख्यमंत्री ठाकरे यांनी विधानभवनात विविध शासकीय कामकाजाचा आढावा घेतला. सूर्यास्तावेळी विधान भवनातून मुख्यमंत्री ठाकरे बाहेर पडत असताना विधान भवनावरील राष्ट्रध्वज उतरविणे सुरु होते. हे ठाकरे यांच्या लक्षात येताच ते विधानभवन परिसरात थांबले. राष्ट्रध्वज संहितेचे पालन करीत ध्वज उतरविल्यानंतर ते विधानभवनातून बाहेर पडले. मुख्यमंत्री राष्ट्रध्वज संहितेचे पालन करीत असल्याचे पाहून विधान भवन परिसरात उभे असलेले विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, अधिकाऱ्यांनाही त्यांच्या भूमिकेबद्दल अभिमान वाटला.राष्ट्रध्वजाला फडकवत वा उतरवत असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे.राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी नागरिकांना माहीत आहे. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रथा आहे. रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे. संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे. ध्वज फडकवताना व उतरवताना बिगुल वाजविलाच पाहिजे.राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोशाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतात. जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल तेव्हा तो सावधान स्थितीत उभा राहील. सरकारी अधिकाऱ्यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्रीNational Flagराष्ट्रध्वज