लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जबरी चोरीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या एका अल्पवयीन मुलीला तिच्या मित्राने पोलिसाच्या तावडीतून पळवून नेले. एखाद्या सिनेमातील वाटावा असा हा प्रसंग मेयो हॉस्पिटलमध्ये गुरुवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडला. यामुळे पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे.आरोपी मुलगी १७ वर्षे ११ महिन्यांची आहे. कोंढाळी पोलिसांनी तिला तिच्या साथीदारांसह एका जबरीचोरीच्या गुन्ह्यात बुधवारी पकडले होते. तिचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्यामुळे प्राथमिक चौकशीनंतर तिला बाल सुधारगृहात पाठविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. त्यानुसार, कोंढाळी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस शिपायी जोत्स्ना भजनराव धुर्वे (वय २६) हिने तिला गुरुवारी नागपुरातील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला मुलींच्या बाल सुधारगृहात दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे तिला सुधारगृहात नेण्यापूर्वी पोलीस कर्मचारी जोत्स्ना हिने तिला मेयोत तपासणीसाठी आणले. यावेळी रात्रीचे ७ वाजले होते. जोत्स्ना आरोपी मुलीला घेऊन उपचारासाठी उभी असताना अचानक मुलीचा मित्र राकेश ऊर्फ भूऱ्या रमेश वानखेडे (वय २४, रा. नंदनवन झोपडपट्टी) तेथे आला. त्याने जोत्स्नाच्या हाताला झटका मारून मुलीला ताब्यात घेतले आणि आपल्या पल्सर मोटरसायकलवर (एमएच ४९/ झेड ५०८१) बसवून सुसाट वेगाने पळून गेला. या प्रकारामुळे पोलीस कर्मचारी जोत्स्ना हादरली. मदतीसाठी तिने आरडाओरड केली. मात्र, तिच्या मदतीला कुणी धावण्यापूर्वीच आरोपी भूऱ्या आरोपी मुलीला घेऊन पळून गेला होता. त्यामुळे मेयो परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. जोत्स्नाने ही बाब आधी आपल्या वरिष्ठांना कळविली. नंतर तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. महिला सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. थोरात यांनी जोत्स्नाच्या तक्रारीवरून आरोपी भूऱ्याविरुद्ध अपहरण करणे तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. भूऱ्या आणि त्याच्यासोबत पळून गेलेल्या मुलीचा पोलीस शोध घेत आहेत.
अन् तो तिला घेऊन पळाला :महिला पोलीस बघतच राहिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 21:01 IST
जबरी चोरीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या एका अल्पवयीन मुलीला तिच्या मित्राने पोलिसाच्या तावडीतून पळवून नेले. एखाद्या सिनेमातील वाटावा असा हा प्रसंग मेयो हॉस्पिटलमध्ये गुरुवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडला. यामुळे पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे.
अन् तो तिला घेऊन पळाला :महिला पोलीस बघतच राहिली
ठळक मुद्देमेयो हॉस्पिटलमधील घटनेने खळबळ